Summer Skin Care : सनस्क्रीन वापरताना डोळ्यांची काळजी घ्या, डोळ्यांचं नुकसान रोखा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात सनस्क्रीनमुळे त्वचा सुरक्षित राहते. चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतो, पण काही वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे ते डोळ्यांत जातं आणि जळजळ आणि खाज येणं यासारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे सनस्क्रीन लावाल तेव्हा तुमच्या त्वचेइतकीच तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या.
मुंबई : उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन लावत असाल तर ही माहिती नक्की वाचा. तीव्र सूर्यप्रकाश आणि हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर आवश्यक आहे. पण चुकून हे क्रिम तुमच्या डोळ्यात गेलं तर ते त्रासदायक ठरु शकतं.
सनस्क्रीन हे एक आवश्यक सुरक्षा कवच आहे, पण ते सावधपणे वापरलं पाहिजे. काळजीपूर्वक वापरलं तर डोळ्यांचं नुकसान होणार नाही. उन्हाळ्यात सनस्क्रीनमुळे त्वचा सुरक्षित राहते. चेहऱ्यावर सनस्क्रीन लावताना काही वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे ते डोळ्यांत जातं आणि डोळ्यांना जळजळ आणि खाज येणं यासारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे सनस्क्रीन लावाल तेव्हा तुमच्या त्वचेइतकीच डोळ्यांची काळजी घ्या.
advertisement
डोळ्यांना होणारं नुकसान -
बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक सनस्क्रीनमध्ये अॅव्होबेन्झोन नावाचा एक विशेष घटक असतो. यामुळे अतिनील किरणांचा परिणाम रोखण्यास मदत होते. पण हे क्रिम डोळ्यांच्या संपर्कात आलं तर त्यामुळे जळजळ होते. डोळ्यांतून पाणी येणं, डोळे लालसर होणं, डोळ्यांना खाज सुटणं ही त्याची सामान्य लक्षणं आहेत. थोडंसं सनस्क्रीन डोळ्यांत गेलं तर यामुळे सहसा कायमचं नुकसान होत नाही. पण जर हे वारंवार घडत राहिलं डोळ्यांचं नुकसान होतं.
advertisement
सनस्क्रीन लावताना अशी घ्या काळजी -
सनस्क्रीन लावताना थोडी काळजी घेतली तर ही समस्या सहज टाळता येते. त्याआधी तुमच्या त्वचेसाठी कोणत्या प्रकारचं सनस्क्रीन चांगलं असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या शिफारसीनुसार, मिनरल्स म्हणजेच खनिजं असलेलं सनस्क्रीन, जसं की टायटॅनियम डायऑक्साइड किंवा झिंक ऑक्साईड असलेलं सनस्क्रिन अधिक सुरक्षित असतात. हे त्वचेवर राहतात आणि डोळ्यांत जाण्याची शक्यता कमी असते.
advertisement
सनस्क्रीन स्प्रे
स्प्रे सनस्क्रीन वापरत असाल तर ते थेट चेहऱ्यावर स्प्रे करू नका. प्रथम ते हातात घ्या आणि नंतर हळूहळू चेहऱ्यावर लावा. यामुळे स्प्रे थेट डोळ्यात जाऊन इजा होणार नाही.
लहान मुलांसाठी महत्त्वाचं -
मुलांच्या बाबतीत अतिरिक्त काळजी घेणं आवश्यक आहे. त्यांना स्वतः सनस्क्रीन लावू देऊ नका कारण ते अनावधानानं त्यांच्या डोळ्यांना लागू शकतं.
advertisement
सनस्क्रीन डोळ्यात गेलं तर -
- सर्वप्रथम, एक लक्षात ठेवा, घाबरू नका.
- डोळे ताबडतोब स्वच्छ पाण्यानं धुवा.
- शक्य असेल तर फिल्टर केलेलं किंवा बाटलीबंद पाणी वापरा.
- 15 ते 20 मिनिटं डोळे धुत राहा आणि त्यादरम्यान डोळे मिचकवा, डोळ्यांची उघडझाप करा.
- कॉन्टॅक्ट लेन्सेस घातले असतील तर डोळे धुण्यापूर्वी ते काढून ठेवायला विसरु नका.
- धुतल्यानंतर काही प्रमाणात जळजळ किंवा लालसरपणा कायम राहू शकतो, परंतु काही तासांतच तो कमी होईल.
- जळजळ कमी करण्यासाठी थंड पाण्याचा कॉम्प्रेस लावू शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आय ड्रॉप्स वापरू शकता.
- 24 तासांनंतरही आराम मिळत नसेल, तर विलंब न करता नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 29, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Skin Care : सनस्क्रीन वापरताना डोळ्यांची काळजी घ्या, डोळ्यांचं नुकसान रोखा