Summer : झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा तुरटी, उन्हाळ्यातही चेहर दिसेल टवटवीत

Last Updated:

उन्हात जाण्याआधी तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर तर रात्री झोपण्यापूर्वी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तो म्हणजे चेहऱ्यावर तुरटी लावण्याचा. रात्री चेहऱ्यावर तुरटी लावण्याचे अनेक फायदे आहेत, यामुळे दुसऱ्या दिवशी तुमची त्वचा चमकदार दिसेल.

News18
News18
मुंबई : खूप उन्हामुळे त्वचा काळवंडते. घामामुळे त्वचेवर चिकट थर येतो. त्यामुळे फ्रेश वाटत नाही. उन्हात जाण्याआधी तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर तर रात्री झोपण्यापूर्वी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तो म्हणजे चेहऱ्यावर तुरटी लावण्याचा. रात्री चेहऱ्यावर तुरटी लावण्याचे अनेक फायदे आहेत, यामुळे दुसऱ्या दिवशी तुमची त्वचा चमकदार दिसेल.
advertisement
त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यातलाच एक उपाय म्हणजे तुरटी. चेहऱ्यावर तुरटी योग्यरित्या लावली तर त्वचा उजळते, डाग कमी होतात आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. तुरटी पारदर्शक स्फटिकासारखी दिसते.
आयुर्वेदिक गुणधर्मांसाठी तुरटी ओळखली जाते. तुरटीमुळे त्वचेची जळजळ कमी होते. पहिल्यांदाच तुरटी लावत असाल तर एकदा पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे.
advertisement
- तुरटी लावण्याचा एक मार्ग म्हणजे गुलाब पाण्यात किंवा साध्या पाण्यात विरघळवून तुरटीची पावडर चेहऱ्यावर लावणं
- तुरटी हळदीत मिसळून चेहऱ्यावर लावता येते. यासाठी एक चमचा तुरटी पावडरमध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनंतर धुवा.
advertisement
- त्वचेचा पोत मऊ ठेवण्यासाठी चेहऱ्यावर तुरटी आणि मध लावू शकता. यासाठी एक चमचा तुरटी पावडर एक चमचा मधात मिसळा आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला आणि पेस्ट बनवा. वीस ते तीस मिनिटं चेहऱ्यावर लावल्यानंतर हलक्या हातानं धुवा. यामुळे त्वचा मऊ होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer : झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा तुरटी, उन्हाळ्यातही चेहर दिसेल टवटवीत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement