Papaya : उन्हाळ्यात अशी घ्या पोटाची काळजी, पचनक्रिया राहिल ठणठणीत

Last Updated:

सकाळचा नाश्ता चांगला असेल तर पोटाचं आरोग्यही चांगलं राहील, पण जर नाश्ता बरोबर नसेल तर पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. यासाठी न्याहारीत पपई खाल्ल्यानं पोटातील घाण निघून जाते आणि पचनक्रिया सुलभ होते. पपईमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होणं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्यात अनेकदा पोट खराब होतं. खाण्याच्या छोट्या छोट्या सवयींचाही आरोग्यावर मोठा परिणाम होतो. सकाळचा नाश्ता चांगला असेल तर पोटाचं आरोग्यही चांगलं राहील, पण नाश्ता योग्य नसेल तर पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. न्याहारीत पपई खाल्ल्यानं पोटातील घाण निघून जाते आणि पचनक्रिया सुलभ होते. पपईमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी पपईचा उपयोग होतो.
तुम्हालाही पोटाच्या समस्या जाणवत असतील आणि पोट नीट साफ होत नसेल, तर पपई हे फळ पचनासाठी खूप फायदेशीर आहे. पोट खराब असेल तर पोटात गॅस तयार होणं, पोट गुरगुरणं, पोट दुखणं किंवा पोट व्यवस्थित साफ न होणं म्हणजेच बद्धकोष्ठता देखील होते. पपईमुळे, पोटातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या जाणवत नाहीत.
advertisement
पोटाची अंतर्गत स्वच्छता
पपई खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटत नाही. पपईमुळे पोट चांगलं स्वच्छ होतं. पपईमध्ये आढळणारा पपेन हा घटक पचनक्रिया सुरळीत करतो. बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त या समस्येपासूनही आराम मिळतो.
त्वचा चमकदार करण्यासाठी उपयुक्त
पपईत व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे कोलेजन निर्मितीला चालना मिळते. त्वचेला नुकसान पोहोचवणारे घटक यामुळे नष्ट होतात. पपई खाल्ल्यानं चेहऱ्यावरच्या मुरुमांचं प्रमाण कमी होतं, पपईमुळे त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते.
advertisement
यकृत आणि हृदयासाठी देखील फायदेशीर
पपईत फोलेट, पोटॅशियम आणि फायबर असल्यानं, रक्तदाब आणि कोलेस्टरॉलची पातळी कमी होते. यातून शरीराला मिळणारे अँटी-ऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. पपई यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त
पपई म्हणजे व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत. त्यामुळे पपई खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. यामुळे आजारही दूर राहतात. सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी पपई खाऊ शकता. न्याहारीत सर्वात आधी, पपई खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
advertisement
या टिप्स लक्षात ठेवा -
  • पपई खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतरच दुसरं काही खा किंवा प्या.
  • सकाळी चहा पिण्याची सवय असेल तर पपई खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नका.
  • पूर्णपणे पिकलेली पपईच खरेदी करा.
  • पपई दूध, दही किंवा आंबट फळांसोबत खाऊ नका.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Papaya : उन्हाळ्यात अशी घ्या पोटाची काळजी, पचनक्रिया राहिल ठणठणीत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement