Dombivali Accident : महापालिकेच्या गाडीने वृद्ध महिलेला चिरडलं,अपघाताची थरार घटना CCTVत कैद
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डोंबिवलीतून मोठी बातमी समोर आली आहे.या घटनेत भरधाव महानगरपालिकेच्या एका गाडीने वृद्ध महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीच्या छेडा रोडवर ही घटना घडली आहे.
Dombivali Accident News :प्रदिप भांगे, डोंबिवली : डोंबिवलीतून मोठी बातमी समोर आली आहे.डोंबिवली पूर्वेतील छेडा रोडवर एका 75 वर्षीय महिलेला पालिकेच्या विद्युत कंत्राट गाडीने चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तृप्ती म्हसकर (वय 75) असे मृत महिलेचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला तब्बल दीड तास उलटू देखील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतरम माध्यमांनी फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले होते.
डोंबिवली पूर्वेतील छेडा रोड परिसरात सायंकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पथदिवे दुरुस्तीचे काम एस. एस. इलेक्ट्रिक कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीची पथदिवे दुरुस्ती करणारी गाडी या रस्त्याने जात असताना समोर चालणाऱ्या वृद्ध महिलेला गाडीने ठोकल्याची घटना घडली होती.यावेळी गाडीच्या समोरच्या चाकाखाली महिला आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.त्यामुळे त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची बाब झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
advertisement
या घटनेनंतर स्थानिक नागरिक राहुल म्हात्रे,रोहन म्हात्रे, रितेश गोईल, विशाल कराळे, अमेय बांदेकर यांनी चालकाला रोखून ठेवले होते. विशेष म्हणजे या घटनेनंतर वाहन चालकाने महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची तसदी देखील दाखवली नसल्याची माहिती आहे. याउलट तो घटनास्थळी गाडीतच बसला होता. ही घटना स्थानिकांनी पाहिल्यानंतर तत्काळ हालचाली करत अपघातग्रस्त महिलांच्या मुलाला बोलावून घेतलं.त्यानंतर महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान या घटनेच्या पाऊन तास उलटल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.या घटनेनंतर आता पोलीस वाहनचालकावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेडफोनमुळे गेला जीव
भांडुपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव दीपक पिल्ले (17) असे आहे. दीपक हा एलबीएस मार्गावरून आपल्या घराकडे जात होता. मात्र, रस्त्याच्या कडेला महावितरणची हाय-टेन्शन वायर खुली अवस्थेत पडलेली होती.पावसामुळे रस्त्याला चिखल आणि पाणी साचले होते. या वायरच्या संपर्कात येताच दीपकला जोरदार शॉक बसला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कानात हेडफोन घालून चालत होता. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर दिलेला इशारा त्याच्या कानावरच गेला नाही. काही लोकांनी त्याला मोठ्याने हाक मारून धोका टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र हेडफोनमुळे त्याला काहीच ऐकू आलं नाही आणि तो थेट विजेच्या तारेच्या संपर्कात गेला.
याच ठिकाणी अनेक नागरिक प्रवास करत असतात. स्थानिकांनी जागरूकता दाखवत, इतरांना बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला. मात्र दीपकला वाचवणे शक्य झाले नाही.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 09, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivali Accident : महापालिकेच्या गाडीने वृद्ध महिलेला चिरडलं,अपघाताची थरार घटना CCTVत कैद