Vice President Result: सी पी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती, बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Last Updated:

cp radhakrishnan: देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सी. पी. राधाकृष्णन यांनी बाजी मारली आहे.

सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती
सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सी. पी. राधाकृष्णन यांनी बाजी मारली असून इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला आहे. सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत.
आमच्या उमेदवाराला ३१५ मते मिळतील, असे दावा इंडिया आघाडीकडून केला गेला होता. परंतु प्रत्यक्षात ३०० मतेच मिळाल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. ईव्हीएममधून मतचोरी होत असल्याचा मुद्दा पुढे करून विरोधी पक्षाकडून मतपत्रिकेचा आग्रह होत असताना मतपत्रिकेवरच झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे १५ खासदार फुटल्याने इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement

एनडीएचा धमाका, इंडिया आघाडीचे १५ खासदार फोडले

बी सुदर्शन रेड्डी १०० टक्के जिंकतील, असा दावा इंडिया आघाडीकडून होत होता. सत्ताधाऱ्यांमधील काही पक्ष संतुष्ट नसल्याचे सांगून आम्ही या निवडणुकीत इतिहास घडवू, असेही इंडिया आघाडीकडून सांगितले जात होते. परंतु इंडिया आघाडीचेच १५ खासदार फुटल्याने बिहार विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला सर्वांत मोठा झटका बसला आहे.
advertisement
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देऊन आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी यांच्याकडे पाठवला. त्यांच्या राजीनाम्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेणे कायद्याने अनिवार्य होती. एनडीकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान झाले. आज सायंकाळी साडे सात वाजता जाहीर झालेल्या निकालानुसार सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
advertisement

कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन?

सी. पी. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते
आधी त्यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषवले
सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडू राज्यातील आहेत
कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभा खासदारही राहिले
तसेच तामिळनाडू राज्याचे भारतीय जनता पक्षाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली गेली
मराठी बातम्या/देश/
Vice President Result: सी पी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती, बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement