Heatwave : उन्हाळा वाढतोय, तब्येत सांभाळा, तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे थकवा, चक्कर येणं, स्नायू दुखावणं, मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात. सर्व वयोगटात हा परिणाम जाणवतो. त्यामुळे, उष्णतेवर मात करण्यासाठी आणि शरीर आतून थंड राहण्यासाठी मदत करणारे उपाय करणं महत्वाचं आहे. वेळीच आणि योग्य उपचार केल्यानं उष्णतेच्या लाटेत तुम्ही तग धरु शकाल.
मुंबई : उन्हाचे चटके वाढतायत. काही ठिकाणी उष्म्यामुळे, उष्माघात, पेटके येणं, अंगावर पुरळ उठणं आणि डिहायड्रेशन अशा वाढत्या उष्णतेशी अनेक समस्या जाणवतायत. काही उपाय केल्यानं उन्हाळ्याचा त्रास कमी होऊ शकतो.
उष्णतेचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे डिहायड्रेशन, उष्माघात, पायात पेटके येणं, अंगावर पुरळ उठणं. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे थकवा, चक्कर येणं, , स्नायू दुखावणं, मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात. सर्व वयोगटात हा परिणाम जाणवतो. त्यामुळे, उष्णतेवर मात करण्यासाठी आणि शरीर आतून थंड राहण्यासाठी मदत करणारे उपाय करणं महत्वाचं आहे. वेळीच आणि योग्य उपचार केल्यानं उष्णतेच्या लाटेत तुम्ही तग धरु शकाल.
advertisement
काकडी खाणं, फ्लॉवर सारख्या भाज्या, नारळ पाणी, ताक आणि लिंबूपाणी याचा समावेश केल्यानं दिवसभर शरीर थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच चंदनाचा लेप लावल्यानंही त्वचेला थंडावा मिळतो.
शरीराची उष्णता नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठीचे उपाय
1. नारळ पाणी
advertisement
नारळ पाणी प्यायल्यानं शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. हायड्रेशन म्हणजेच शरीराला आवश्यक तेवढ्या पाण्याची पातळी कायम असणं. नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्व, खनिजं आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, यामुळे उष्णतेच्या दिवसात शरीर रिहायड्रेट करण्यासाठी आणि त्यातून ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते. नारळाचं पाणी प्यायल्यानं किडनी स्टोनचा धोका कमी होतो, तसंच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही हे पाणी उपयुक्त आहे. आहारात आवश्यक अँटिऑक्सिडंट्स आणि व्यायामाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.
advertisement
2. ताक
पिढ्यानपिढ्या हमखास केला जाणारा उपाय म्हणजे ताक. ताक हे सर्वोत्तम शीतपेय आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो, चयापचयाचा वेग सुधारतो, आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजांचा पुरवठा यामुळे शक्य होतो. ताक आणखी स्वादिष्ट बनवण्यासाठी, भाजलेलं जिऱ्याची पूड, खडे मीठ आणि सुक्या पुदिन्याची पानं ताकात घाला.
3. शारीरिक हालचाली मर्यादित करा
advertisement
व्यायाम करत असाल तर उष्णतेच्या काळात जास्त व्यायाम करणं टाळा. सकाळी किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना कमी तीव्रतेचे व्यायाम करा.
4. श्वास घेता येतील असे कपडे घाला
हवेचा प्रवाह चांगला राहण्यासाठी हलक्या रंगाचे आणि सैल कपडे घाला. तसंच, थेट सूर्यप्रकाशात बाहेर जात असाल तर टोपी आणि गॉगल वापरा. छत्रीनंही उन्हापासून संरक्षण होईल.
advertisement
5. हलकं अन्न, सॅलडवर भर द्या
उन्हाळ्यामध्ये ज्या पदार्थांमध्ये, पाणी जास्त असेल असे पदार्थ खाण्यावर भर द्या. यामुळे हायड्रेशनची पातळी देखील वाढू शकते. काकडी आणि टरबूज यासारखे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ फायदेशीर असतात. याशिवाय, सॅलड आणि फळं यांसारखं हलकं अन्न खा. जेणेकरून जड अन्नामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येणार नाही.
advertisement
6. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय -
मनगट, मान, छाती या भागांवर कोल्ड कॉम्प्रेस लावल्यानं किंवा थंड पाण्यात पाय भिजवल्यानं शरीराचं तापमान लवकर कमी होऊ शकतं.
उन्हाळ्यात, प्रकृतीचं स्वास्थ्य जपण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स -
- दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ आणि हायड्रेटिंग पदार्थ खा - प्या.
- साखरेचे आणि अल्कोहोलयुक्त पेयांचं सेवन मर्यादित ठेवा, कारण यामुळे डिहायड्रेशन होतं.
- शरीराला रिचार्ज करण्यासाठी 7-9 तास पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या.
- सुस्ती आणि पोट फुगणं टाळण्यासाठी जड जेवणाऐवजी हलकं जेवण करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 26, 2025 2:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heatwave : उन्हाळा वाढतोय, तब्येत सांभाळा, तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या