Fruits : बद्धकोष्ठता टाळण्यासाठी करा फलाहार, पचन होईल सुलभ आणि पोट राहिल स्वच्छ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बद्धकोष्ठता असेल तर फलाहार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यासाठी सहा फळं आहारतज्ज्ञांनी सुचवली आहेत. फळांमुळे अडकलेला मल नैसर्गिकरित्या साफ होईल,आणि पोट हलकं राहील. बद्धकोष्ठता घालवण्यासाठी ही फळं खाल्ल्यानं पचनसंस्था मजबूत होते तसंच शरीर डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत होते.
मुंबई : फास्ट फूडचं आकर्षण आणि सकस अन्न न खाणं यामुळे पोटाशी संबंधित समस्या खूप वाढल्या आहेत. यापैकी, बद्धकोष्ठता ही समस्या सर्व वयोगटांना भेडसावते. फास्ट फूड, आहारात फायबरची कमतरता, पाणी कमी पिणं, आणि शारीरिक हालचालींचा अभाव यासारख्या अनेक कारणांमुळे, आतडी योग्यरित्या स्वच्छ होत नाहीत, ज्यामुळे मल जमा होऊ लागतो आणि पोट जड वाटतं. यामुळे होणारी बद्धकोष्ठता कधीकधी दीर्घकाळ टिकते. ज्यामुळे मूळव्याधासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.
बद्धकोष्ठता असेल तर फलाहार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यासाठी सहा फळं आहारतज्ज्ञांनी सुचवली आहेत. फळांमुळे अडकलेला मल नैसर्गिकरित्या साफ होईल,आणि पोट हलकं राहील. बद्धकोष्ठता घालवण्यासाठी ही फळं खाल्ल्यानं पचनसंस्था मजबूत होते तसंच शरीर डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत होते.
फळांमध्ये नैसर्गिकरीत्या फायबरचं म्हणजेच पचनासाठी आवश्यक तंतुमयता आणि पाण्याचं प्रमाण असल्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते आणि मल मऊ करण्यासाठी आणि ते सहजपणे बाहेर काढण्यासाठी मदत होते.
advertisement
रोजच्या आहारात फळांचा समावेश केला तर बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतोच, शिवाय पोट नेहमीच हलकं आणि स्वच्छ राहतं. हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
किवी - डॉ. सेठींच्या मते, किवीमध्ये अॅक्टिनिडिन नावाचं एंजाइम असतं, यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. अॅक्टिनिडिनमुळे पचन प्रक्रिया सुधारते. त्याच वेळी, पचन चांगलं झाल्यानं बद्धकोष्ठतेचं प्रमाण कमी होतं.
advertisement
नाशपती - नाशपती म्हणजेच पेर. पेरामध्ये सॉर्बिटॉल नावाचा घटक रेचक म्हणून काम करतो. यामुळे मल मऊ होतं आणि आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
सफरचंद - सफरचंदात फायबरचं प्रमाण जास्त असतं. फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
advertisement
पपई - पपईमध्ये असलेले पपेन एंझाइम पचनक्रियेला मदत करतं, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. याशिवाय,पपईमध्ये फायबर आणि पाण्याच प्रमाण जास्त असतं, यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते.
प्लम किंवा आलुबुखार - आलुबुखारमुळे आतड्यांची हालचाल सुधारून बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते. प्लममध्ये भरपूर फायबर असतं, यामुळे मल मऊ होतं आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते.
advertisement
बेरी - या सर्वांव्यतिरिक्त, बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. हे दोन्ही घटक बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. अँटिऑक्सिडंट्स बद्धकोष्ठतेमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी याची मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 24, 2025 5:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fruits : बद्धकोष्ठता टाळण्यासाठी करा फलाहार, पचन होईल सुलभ आणि पोट राहिल स्वच्छ