Snake Facts : नाग-नागीणमध्ये फरक कसा कसा ओळखायचा? कोण आहे सर्वात जास्त धोकादायक?

Last Updated:
तसं पाहाता सापाचं लिंग ओळखणं खूप अवघड मानलं जातं, तरी काही संकेतांच्या आधारे त्याचा अंदाज लावता येतो.
1/9
पावसाळ्यात सापांचा सुळसुळाट होतोच.  याच काळात सापांची हालचालही वाढते आणि घराच्या अंगणात, शेतात, जंगलात किंवा रस्त्याच्या कडेला ते अनेकदा दिसतात. पण अचानक एखादा साप समोर आला, तर नेहमी लोकांच्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो. हा साप नर (नाग) आहे की मादी (नागीण)? एवढ नाही तर काही लोकांचा असा समज आहे की नागाचं विष जास्त धोकादायक आहे, तर काही लोक असं ही मानतात की नागीण सर्वात धोकादायक आहे.

advertisement
2/9
तसं पाहाता सापाचं लिंग ओळखणं खूप अवघड मानलं जातं, तरी काही संकेतांच्या आधारे त्याचा अंदाज लावता येतो.
तसं पाहाता सापाचं लिंग ओळखणं खूप अवघड मानलं जातं, तरी काही संकेतांच्या आधारे त्याचा अंदाज लावता येतो.
advertisement
3/9
सापाचं लिंग ओळखणं का महत्त्वाचं?साप नर आहे की मादी, हे जाणून घेणं केवळ उत्सुकतेपोटी नव्हे तर वैज्ञानिक आणि पर्यावरण अभ्यासकांसाठीही खूप गरजेचं आहे. यामुळे सापांच्या वर्तनाचा, प्रजनन प्रक्रियेचा आणि त्यांच्या संवर्धनाचा अभ्यास करणं सोपं होतं. शिवाय, प्रजनन (breeding) आणि काळजी घेण्यासाठीही ही माहिती उपयुक्त असते. कारण नर आणि मादी सापांचे वर्तन आणि गरजा वेगळ्या असतात.
सापाचं लिंग ओळखणं का महत्त्वाचं?
साप नर आहे की मादी, हे जाणून घेणं केवळ उत्सुकतेपोटी नव्हे तर वैज्ञानिक आणि पर्यावरण अभ्यासकांसाठीही खूप गरजेचं आहे. यामुळे सापांच्या वर्तनाचा, प्रजनन प्रक्रियेचा आणि त्यांच्या संवर्धनाचा अभ्यास करणं सोपं होतं. शिवाय, प्रजनन (breeding) आणि काळजी घेण्यासाठीही ही माहिती उपयुक्त असते. कारण नर आणि मादी सापांचे वर्तन आणि गरजा वेगळ्या असतात.
advertisement
4/9
ओळखण्याचे काही संकेतशेपटीची लांबी : नर सापांची शेपटी मादी सापांच्या तुलनेत लांब असते. उदाहरणार्थ, पफ अॅडर (Bitis arietans) आणि इथिओपियन माउंटन अॅडर प्रजातींमध्ये हा फरक स्पष्ट दिसतो. नर सापांची शेपटी ही बारीक दिसते, तर मादी सापांची शेपटी लहान आणि जाडसर दिसते. याला शास्त्रीय भाषेत Sexual Dimorphism म्हटलं जातं. मात्र हे सर्व प्रजातींना लागू होतं असं नाही.
ओळखण्याचे काही संकेत
शेपटीची लांबी : नर सापांची शेपटी मादी सापांच्या तुलनेत लांब असते. उदाहरणार्थ, पफ अॅडर (Bitis arietans) आणि इथिओपियन माउंटन अॅडर प्रजातींमध्ये हा फरक स्पष्ट दिसतो. नर सापांची शेपटी ही बारीक दिसते, तर मादी सापांची शेपटी लहान आणि जाडसर दिसते. याला शास्त्रीय भाषेत Sexual Dimorphism म्हटलं जातं. मात्र हे सर्व प्रजातींना लागू होतं असं नाही.
advertisement
5/9
रंगाचा फरक

अनेक प्रजातींमध्ये नर आणि मादींच्या रंगात फरक दिसतो. साधारणतः नर सापांचा रंग गडद असतो, तर मादी साप तुलनेने फिकट तपकिरी असतात. उदाहरणार्थ, बूमस्लॅंग प्रजातीमध्ये नर हिरवट रंगाचा तर मादी ब्राउन रंगाची असते. मात्र लहान वयाच्या सापांमध्ये हा फरक ओळखणं कठीण ठरतं.

6/9
यामागे काही वैज्ञानिक पद्धती देखील आहेतहेमिपेनिस प्रोबिंग
वाइल्डलाइफ तज्ज्ञ अचूक ओळख करण्यासाठी ही पद्धत वापरतात. यात एक बारीक मेटल प्रोब सापाच्या क्लोकामध्ये (जननेंद्रियाच्या उघडण्यात) टाकली जाते. नर सापांमध्ये ती सुमारे 10–12 टेल स्केलपर्यंत जाते, तर मादीमध्ये फक्त 2–3 स्केलपर्यंतच जाते. अजगरांसारख्या मोठ्या सापांमध्ये ही पद्धत प्रभावी ठरते.
यामागे काही वैज्ञानिक पद्धती देखील आहेत
हेमिपेनिस प्रोबिंग
वाइल्डलाइफ तज्ज्ञ अचूक ओळख करण्यासाठी ही पद्धत वापरतात. यात एक बारीक मेटल प्रोब सापाच्या क्लोकामध्ये (जननेंद्रियाच्या उघडण्यात) टाकली जाते. नर सापांमध्ये ती सुमारे 10–12 टेल स्केलपर्यंत जाते, तर मादीमध्ये फक्त 2–3 स्केलपर्यंतच जाते. अजगरांसारख्या मोठ्या सापांमध्ये ही पद्धत प्रभावी ठरते.
advertisement
7/9
पॉपिंग तंत्रलहान सापांमध्ये प्रोबिंग कठीण असल्याने वैज्ञानिक पॉपिंग पद्धत वापरतात. यात क्लोकाला हळूवार बाहेर ओढून लिंग ओळखलं जातं.
आधुनिक काळात अल्ट्रासाऊंडच्या सहाय्यानेही नर-मादी साप ओळखणं शक्य झालं आहे.
पॉपिंग तंत्र
लहान सापांमध्ये प्रोबिंग कठीण असल्याने वैज्ञानिक पॉपिंग पद्धत वापरतात. यात क्लोकाला हळूवार बाहेर ओढून लिंग ओळखलं जातं.
आधुनिक काळात अल्ट्रासाऊंडच्या सहाय्यानेही नर-मादी साप ओळखणं शक्य झालं आहे.
advertisement
8/9
खबरदारी सर्वात महत्त्वाचीजर समोर साप दिसला, तर घाबरून काहीही कृती करू नका. अचानक पकडण्याचा प्रयत्न केल्यास साप चावू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेणंच शहाणपणाचं आहे.
खबरदारी सर्वात महत्त्वाची
जर समोर साप दिसला, तर घाबरून काहीही कृती करू नका. अचानक पकडण्याचा प्रयत्न केल्यास साप चावू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेणंच शहाणपणाचं आहे.
advertisement
9/9
एकंदरीत, साप नर आहे की मादी, हे ओळखणं अवघड जरूर आहे, पण अशक्य नाही. शेपटीची लांबी, रंग आणि वैज्ञानिक पद्धती जसं हेमिपेनिस प्रोबिंग, पॉपिंग किंवा अल्ट्रासाऊंड यांमुळे योग्य माहिती मिळते. हे ज्ञान केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सापसंवर्धन आणि मानव-साप संघर्ष टाळण्यासाठीही उपयुक्त ठरतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement