Hair Care : निरोगी आणि दाट केसांसाठी घरगुती उपाय, केस होतील चमकदार

Last Updated:

केसांना काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी, योग्य काळजी आणि पोषण खूप महत्वाचं आहे. योग्य उपाय नियमित केल्यानं केस नैसर्गिकरित्या काळे राहतील.

News18
News18
मुंबई : जीवनशैलीतले बदल, ताण आणि पोषणाचा अभाव यामुळे केस अकाली पांढरे होतात. पण, खाण्याच्या सवयींमध्ये आणि जीवनशैलीतल्या बदलांमुळे केस पांढरे होण्यापासून रोखणं शक्य आहे. केस निरोगी, काळे आणि चमकदार ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील. केस अकाली पांढरे होऊ नयेत असं वाटत असेल, तर हे पाच उपाय करून केस दीर्घकाळ काळे आणि निरोगी ठेवू शकाल. केसांना दीर्घकाळ काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य काळजी आणि पोषण आवश्यक आहे.
काळ्याभोर केसांसाठी टिप्स -
1. आवळा - आवळा केसांसाठी वरदान आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आवळ्याच्या नियमित वापरानं केसांच्या मुळांना पोषण मिळतं. आवळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि केसांना लावा. केस नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यास यामुळे मदत होते.
advertisement
2. कांद्याचा रस - कांद्याच्या रसामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होते.रस केसांच्या मुळांवर लावा आणि काही तास तसंच राहू द्या. नियमित वापरानं केसांचा रंग नैसर्गिकरित्या काळा राहतो.
3. कढीपत्ता आणि खोबरेल तेल मिश्रण - कढीपत्ता नारळाच्या तेलात उकळा, मिश्रण थंड होऊ द्या आणि केसांना लावा. कढीपत्त्यात असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रथिन केसांना मजबूत आणि काळे करण्यास मदत करतात. आठवड्यातून दोनदा ते वापरा.
advertisement
4. मेथी आणि दह्याचा मास्क - मेथीचे दाणे आणि दही मिसळून केसांच्या मुळांवर लावा. मेथीमुळे केसांच्या वाढीला गती मिळते आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. यामुळे केस चमकदार आणि काळे ठेवण्यास मदत होते.
5. ताण टाळा आणि संतुलित आहार घ्या - केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ताण. यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा. तसंच, आहारात प्रथिनं, जीवनसत्त्व आणि खनिजं असलेले पदार्थ समाविष्ट करा. यामुळे केसांना आतून पोषण मिळतं.
advertisement
केसांना काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी, योग्य काळजी आणि पोषण खूप महत्वाचं आहे. योग्य उपाय नियमित केल्यानं केस नैसर्गिकरित्या काळे राहतील.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : निरोगी आणि दाट केसांसाठी घरगुती उपाय, केस होतील चमकदार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement