Health tips : आयुर्वेदिक औषधांची उपयुक्त मात्रा, शरीरासाठी शक्तिशाली ठरतील हे उपाय

Last Updated:

निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणं महत्वाचं आहे. यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात काही सोप्या पण प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करावा लागेल. यासाठी आयुर्वेदातले उपायही परिणामकारक ठरु शकतात. 

News18
News18
मुंबई : पूर्वी जितकं सकस अन्नधान्य मिळायचं तसं आता मिळत नाही. त्यामुळे आधीच्या पिढ्यांचं आरोग्य आणि आताच्या जनरेशनचं आरोग्य यात फरक दिसतो. त्यात धावपळीच्या जीवनशैलीमुळे, तणावांमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक वेळा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे खोकला, सर्दीपासून गंभीर आजारांपर्यंतच्या आजारांना तोंड द्यावं लागतं.
निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणं महत्वाचं आहे. यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात काही सोप्या पण प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करावा लागेल. यासाठी आयुर्वेदातले उपायही परिणामकारक ठरु शकतात.
advertisement
आलं - आल्यामधल्या घटकांमुळे जळजळ कमी होते आणि शरीराला हानिकारक घटकांशी लढण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे छोटे तुकडे चावू शकता. आलं, लिंबू घालून त्याचा रस पिऊ शकता. जेवणात आल्याचा वापर केल्यानं अन्नाची चव चांगली लागेल आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल.
advertisement
हळद - हळदीच्या औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. हळदीतल्या गुणधर्मांमुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि संक्रमणांशी लढण्याची ताकद मिळते. कोमट दुधात हळद मिसळून ते दररोज प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय शरीर आतून स्वच्छ देखील होतं.
गुळवेल - गुळवेल हे आयुर्वेदातील एक प्रसिद्ध औषध आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे. नैसर्गिकरीत्या जीवाणूला प्रतिबंध करणारे गुणधर्म यात आहेत. गुळवेल नुसता चावू शकता किंवा त्याच्या पानांचा रस पिऊ शकता. याशिवाय, कोमट पाण्यात गुळवेल पावडर मिसळून पिणं देखील फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराचं अनेक आजारांपासून रक्षण होतं.
advertisement
त्रिफळा - त्रिफळा, जे तीन प्रकारच्या सुक्या मेव्याचं मिश्रण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शरीराला हानी पोहोचवणारे विषारी घटक यामुळे काढून टाकले जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. त्रिफळा पावडर रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. ही पावडर दुधात मिसळू शकता, ज्यामुळे त्याचा प्रभाव आणखी जाणवतो.
advertisement
तुळशी - तुळस शरीराला आजारांपासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. तुळशीतले घटक, शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढतात. दररोज सकाळी ताजी तुळशीची पानं चावणं किंवा तुळशीचा रस थोडा मध मिसळून पिणं फायदेशीर आहे. तुळशीची पावडर देखील बनवता येते, जी तुम्ही औषध म्हणून वापरू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health tips : आयुर्वेदिक औषधांची उपयुक्त मात्रा, शरीरासाठी शक्तिशाली ठरतील हे उपाय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement