Diabetes : मधुमेह नियंत्रणासाठी हे नक्की करा, तब्येत चांगली राहण्यासाठी सोपा उपाय, वाचा सविस्तर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुमच्या कुटुंबातील एखाद्याला आधीच मधुमेह असेल तर तुम्हालाही अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी काही खास सवयी फायदेशीर आहेत. आहारतज्ज्ञांनी यासाठी काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.
मुंबई : मधुमेहाचं प्रमाण इतकं वाढलंय की, मधुमेह असलेली एखादी तरी व्यक्ती प्रत्येक घरात आढळते. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जीवनशैलीतले बदल आणि वाईट आहार. या कारणांमुळे कमी वयातच अनेकांना मधुमेह होतो. मधुमेहामुळे इतरही गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.
तुमच्या कुटुंबातील एखाद्याला आधीच मधुमेह असेल तर तुम्हालाही अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी काही खास सवयी फायदेशीर आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे.
आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. 10-10-10 असा हा नियम आहे.
advertisement
- दर 45 मिनिटांनी 10 स्क्वॅट्स करा - बराच वेळ बसलात किंवा कोणतीही शारीरिक हालचाल केली नाही तर स्नायू ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाहीत. त्यामुळे लिमा महाजन यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. दर पंचेचाळीस मिनिटांनी फक्त दहा स्क्वॉट्स करा. यामुळे पायांचे मोठे स्नायू सक्रिय होतात, यामुळे रक्तातील साखर ऊर्जा म्हणून वापरली जाते. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
advertisement
- जेवणानंतर दहा मिनिटं चाला - खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढतं. यासाठी त्यांनी एक सल्ला दिलाय. खाल्ल्यानंतर फक्त दहा मिनिटं चालल्यानं रक्तातील साखर सुमारे बावीस मिलीग्राम/डीएलनं कमी होऊ शकतं. चालण्यामुळे स्नायू ग्लुकोज लगेच शोषून घेतात आणि रक्तातील साखर सामान्य राहते. या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल आणि चरबी जमा होण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून, प्रत्येक खाण्यानंतर दहा मिनिटं चाला.
advertisement
- रात्री वेळेत झोपा - रात्री उशिरापर्यंत जागं राहिल्यानं शरीरात तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे साखर आणि रक्तदाब देखील वाढू शकतो.
दररोज वेळेवर झोपण्याची सवय लावली तर हार्मोन्स संतुलित राहतील, इन्सुलिन चांगलं काम करेल आणि रात्रभर साखरेची पातळी नियंत्रणात राहील.
advertisement
योग्य आहाराचं महत्त्व - केवळ व्यायामच नाही तर योग्य आहार महत्त्वाचा आहे. पांढरा ब्रेड किंवा रिफाइंड मैद्याऐवजी ब्राऊन राईस, ओट्स आणि बाजरी खा. भाज्या, सालासकट फळं आणि डाळी अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
या सवयींबरोबरच, गोड पेयं आणि साखर जास्त असलेल्या गोष्टींपासून दूर राहा. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप औषधं किंवा आहारात खूप बदल करण्याची गरज नाही. दिवसभरात थोडीशी हालचाल, वेळेवर झोप आणि योग्य आहार घेतल्यास मोठा फरक पडू शकतो असाही सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : मधुमेह नियंत्रणासाठी हे नक्की करा, तब्येत चांगली राहण्यासाठी सोपा उपाय, वाचा सविस्तर