Belly Fat : वाढलेलं पोट कमी करण्यासाठीची सप्तसूत्री, दिनचर्येतले बदल ठरतील परिणामकारक

Last Updated:

अनेकदा लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रॅश डायटिंग सुरू करतात किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळतात पण त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. हे सर्व करण्यापेक्षा जीवनशैलीत छोटे बदल करून पोटाची चरबी कमी करणं शक्य आहे. 

News18
News18
मुंबई : वाढलेलं पोट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. पोटाची चरबी म्हणजे शरीरात काय सुरु आहे याचा आरसा. यामुळे शरीरासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, चयापचयाचा वेग मंदावतो आणि झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो.
अनेकदा लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रॅश डायटिंग सुरू करतात किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळतात पण त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. हे सर्व करण्यापेक्षा जीवनशैलीत छोटे बदल करून पोटाची चरबी कमी करणं शक्य आहे.
साखरेला अलविदा म्हणा - गोड चहा-कॉफी, बेकरीचे पदार्थ आणि रात्री उशिरापर्यंतचं खाणं ही पोटाची चरबी वाढण्यामागची सर्वात मोठी कारणं आहेत. WHO च्या म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, साखरेचं प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी किंवा शक्यतो पाच टक्क्यांपेक्षा कमी ठेवलं तर वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
सकाळी जिरं किंवा ओव्याचं पाणी पिणं - सकाळी कोमट पाणी अनेक जण पितात. पण जिरं किंवा ओवा घालून कोमट पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते आणि चयापचय गतिमान होतं. वजन कमी करण्यास मदत होते आणि यकृत देखील निरोगी राहते.
प्रथिनयुक्त नाश्ता - नाश्ता ही दिवसातली सर्वात महत्वाची गोष्ट. त्यात पंचवीस-तीस ग्रॅम प्रथिनांचा समावेश करा. अंडी, कॉटेज चीज, अंकुरलेल्या डाळी किंवा ग्रीक दही हे यासाठी चांगले पर्याय आहेत. यामुळे पोट भरलेलं राहिल आणि खाण्याची इच्छा नियंत्रित होईल, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
advertisement
दररोज तीस मिनिटं चाला - वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालणं. दिवसातून तीस मिनिटं चाला, यासाठी दहा मिनिटांची तीन सत्रंही करु शकता. यामुळे शरीर सक्रिय राहील आणि कॅलरीज बर्न होतील.
आहारात आवळा आणि लिंबूचा समावेश करा - आवळा आणि लिंबामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. सकाळी लिंबू पाणी किंवा आवळ्याचा रस पिऊ शकता.
advertisement
रात्री वेळेत झोपा - झोपेच्या कमतरतेमुळे भूकेचे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होते. वजन कमी करण्यासाठी वेळेवर झोपण्याची सवय लावा आणि दररोज रात्री सात-नऊ तास झोपणं शरीरासाठी महत्वाचं आहे.
रात्रीच्या जेवणानंतर काहीही खाऊ नका - जेवण आणि झोपेमधे दोन-तीन तासांचं अंतर ठेवा आणि त्यानंतर काहीही खाऊ नका. दिनचर्येत या सात सवयींचा समावेश केल्यानं शरीरावरील वाढती चरबी कमी करणं शक्य आहे. हे नियमितपणे केल्यानं, कमी वेळात आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात. तुम्हाला कोणतंही पथ्य असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Belly Fat : वाढलेलं पोट कमी करण्यासाठीची सप्तसूत्री, दिनचर्येतले बदल ठरतील परिणामकारक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement