TRENDING:

Garlic : उपाशी पोटी लसूण खाण्याचे फायदे, लसणानं वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, वजन होईल कमी

Last Updated:

सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. लसूण नियमित योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं खाणं महत्वाचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लसणामुळे पदार्थाची लज्जत तर वाढतेच. त्यातले अनेक औषधी गुणधर्म शरीरासाठी उपयुक्त ठरतात. सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. लसूण नियमित योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं खाणं महत्वाचं आहे.
News18
News18
advertisement

Breakfast : नाश्ता करणं टाळू नका, शारीरिक, मानसिक आरोग्यावर होईल परिणाम

रोगप्रतिकारक शक्ती

लसूणमधील अ‍ॅलिसिन नावाचा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्यानं शरीराचं अनेक आजारांशी लढण्यापासून संरक्षण होऊ शकते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त

सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास मदत होते.

advertisement

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. चरबी जलद जळण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.

पचनसंस्था - रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं पचनसंस्था सुधारण्यासाठी मदत होते. पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Constipation : बद्धकोष्ठतेवर हे उपाय नक्की करा, तुम्हाला वाटेल फ्रेश

advertisement

मधुमेह - लसणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना लसूण खाणं फायदेशीर आह.

- सकाळी दात घासल्यानंतर, कच्च्या लसणाची एक पाकळी सोलून खा.

- लसूण थेट गिळू शकता किंवा थोडा चावू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

- कच्चा लसूण खाणं कठीण वाटत असेल तर कोमट पाण्यासोबत घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Garlic : उपाशी पोटी लसूण खाण्याचे फायदे, लसणानं वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, वजन होईल कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल