पावसाळ्यात केस कोरडे, वेडेवाकडे होतात. यासाठी पोषणतज्ज्ञांनी एक हेअर मास्क सांगितला आहे. यामुळे केस निर्जीव न दिसता मुलायम होतात. जास्वंदीच्या फुला-पानांपासून बनवला जाणारा हा नैसर्गिक हेअर मास्क घरी बनवता येतो.
Kidneys : किडन्यांचं आरोग्य जपा, अनावश्यक गोष्टी टाळा, मूत्रपिंडांची ताकद ओळखा
प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका खास हेअर मास्कबद्दल माहिती दिली आहे. कोरडे आणि कडक केस यामुळे मुलायम होतात.
advertisement
हेअर मास्क बनवण्यासाठी जास्वंदीची 4-5 ताजी फुलं, जास्वंदीची 5-6 कोवळी पानं, दोन चमचे कोरफड जेल,
एक टेबलस्पून नारळ किंवा बदाम तेल आणि टाळू खूप कोरडा झाला असेल तर एक टेबलस्पून दही आवश्यक आहे.
हेअर मास्क बनवण्याची कृती -
सर्वप्रथम जास्वंदीची फुलं आणि पानं चांगली धुवून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करून मऊ पेस्ट बनवा. त्यात कोरफड जेल आणि नारळ किंवा बदाम तेल घाला. टाळू खूप कोरडा झाला असेल तर थोडं दही देखील घालू शकता. हे मिश्रण पूर्ण केसांना लावा. तीस मिनिटं तसंच राहू द्या, नंतर कोमट पाण्यानं धुवा. शक्य असेल तर, शॅम्पू करू नका.
Ashwagandha : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांची साथ - अश्वगंधाचा वापर ठरेल उपयुक्त
केसांवर या मास्कचा चांगला परिणाम दिसण्यासाठी पोषणतज्ज्ञ आठवड्यातून एक ते दोन वेळा हा मास्क लावण्याचा सल्ला देतात.
पोषणतज्ज्ञांच्या मते, जास्वंदीमुळे केसांची वाढ चांगली होते आणि यामुळे टाळूला थंडावा मिळतो. कोरफड जेलमुळे केसांना खोलवर ओलावा मिळतो आणि केस मऊ होतात. या तेलामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं. दह्यानं कोरड्या टाळूला हायड्रेशन मिळतं म्हणजे टाळूला आवश्यक ओलावा - आर्द्रता मिळते आणि कोंड्याचं प्रमाण कमी होतं. रासायनिक उत्पादनांपेक्षा या नैसर्गिक उपायानं केसांची काळजी घेतली जाऊ शकते.
