Ashwagandha : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांची साथ - अश्वगंधाचा वापर ठरेल उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आरोग्यदायी फायद्यांसाठी अश्वगंधा वनस्पतीचा वापर होतो. अश्वगंधा पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील यामुळे सुधारतं.
मुंबई : दैनंदिन व्यवहार व्यवस्थित करता यावेत यासाठी आवश्यक असतं चांगलं आरोग्य. संतुलित आहार आणि व्यायाम यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहता येणं शक्य आहे. आयुर्वेदानं आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी वापरता येणाऱ्या अनेक गोष्टी दिल्या आहेत. अश्वगंधा ही त्यातलीच एक प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती...शतकानुशतकं आरोग्यदायी फायद्यांसाठी या वनस्पतीचा वापर होतो. अश्वगंधा पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील यामुळे सुधारतं.
advertisement
अश्वगंधा असलेलं दूध पिण्याचे फायदे -
1. ताण आणि चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त -
अश्वगंधा वनस्पतीमुळे शरीराला तणावाशी लढण्याचं बळ मिळतं. दुधासोबत सेवन केल्यानं कॉर्टिसोल हार्मोनची पातळी नियंत्रित होते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते आणि चिंता कमी होते.
2. झोपेची गुणवत्ता सुधारते -
advertisement
झोपेचा त्रास होत असेल तर अश्वगंधा घातलेलं दूध पिणं हा एक उत्तम उपाय असू शकतो. यामुळे मन शांत होतं आणि गाढ झोप येण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी अश्वगंधा एक ग्लास कोमट दुधात मिसळून प्यायल्यानं निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते.
3. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त -
अश्वगंधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दुधासोबत अश्वगंधा पावडर घालून प्यायल्यानं सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून संरक्षण होतं.
advertisement
4. हार्मोनल संतुलन राखण्यासाठी उपयुक्त -
अश्वगंधा महिला आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे. थायरॉईड आणि इतर संप्रेरकांचं संतुलन राखण्यासाठी याचा उपयोग होतो. मूड स्विंग, थकवा आणि इतर हार्मोनल समस्यांपासून आराम मिळतो.
5. स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर -
व्यायाम किंवा शारीरिक हालचालींमध्ये सक्रिय असलेल्यांसाठी अश्वगंधा दूध हा एक उत्तम पर्याय आहे. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि शारीरिक सहनशक्ती सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
advertisement
6. सूज आणि वेदनांपासून आराम मिळतो -
अश्वगंधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मदत होते. संधिवात आणि सांधेदुखीनं त्रासलेल्यांसाठी हा एक चांगला नैसर्गिक उपाय असू शकतो.
7. लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयुक्त -
advertisement
अश्वगंधा दूध नियमित प्यायल्यानं मेंदूचं कार्य चांगलं होतं. स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.
अश्वगंधा दूध बनवण्यासाठी - एक ग्लास कोमट दूध घ्या. अर्धा चमचा अश्वगंधा पावडर घाला. ते चांगलं मिसळा आणि पाच मिनिटं तसंच राहू द्या. चव वाढवण्यासाठी यात मध किंवा वेलची घालू शकता. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्या. अश्वगंधा मिसळून दूध प्यायल्याने ताण कमी होतो, झोप सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि स्नायूंची ताकद वाढते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Ashwagandha : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांची साथ - अश्वगंधाचा वापर ठरेल उपयुक्त











