High BP : WHO नं सांगितलेल्या टिप्स नक्की वाचा, BP नियंत्रणात ठेवणं होईल सोपं
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उच्च रक्तदाब ही जगभरात जाणवणारी समस्या. या जागतिक समस्येवर WHO नं उच्च रक्तदाब कसा दूर ठेवावा, यासाठी काही टिप्स दिल्यात. या टिप्सचा वापर करून तुम्ही देखील निरोगी राहू शकता.
मुंबई : उच्च रक्तदाब ही जगभरात जाणवणारी समस्या. या जागतिक समस्येवर WHO नं उच्च रक्तदाब कसा नियंत्रणात ठेवावा, यासाठी काही टिप्स दिल्यात. या टिप्सचा वापर करून तुम्ही देखील निरोगी राहू शकता.
उच्च रक्तदाबामुळे आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटनेचा यावर काय सल्ला आहे ते जाणून घेऊया. WHO नं या समस्येला तोंड देण्यासाठीचा मार्ग सांगितला आहे.
उच्च रक्तदाबाची समस्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सामान्य वेगापेक्षा जास्त वेगानं होणं. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो आणि वेळीच उपचार केले नाहीत तर ही समस्या गंभीर होऊ शकते.
advertisement
बऱ्याचदा उच्च रक्तदाबाची लक्षणं ओळखता येत नाहीत आणि अनेकदा रक्तदाब तपासणी केल्यानंतरच रक्तदाब आहे हे कळतं.
वाढतं वय, वजन वाढणं, जास्त सोडियमयुक्त आहार, जास्त मद्यपान, अनुवांशिकता आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणं यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात 30 ते 79 वयोगटातील 1.28 अब्ज नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. 46 टक्के जणांना उच्च रक्तदाब आहे हे माहित नसतं. उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार आणि स्ट्रोक होतो. त्यामुळे, या समस्येवर वेळीच उपचार करणं महत्वाचं आहे.
advertisement
उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखणं, डोकेदुखी, अशक्तपणा, चिंता, उलट्या होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, कानात आवाज येणं, नाकातून रक्त येणं, हृदयाचे ठोके वाढणे आणि दृष्टी अंधुक होणं यासारख्या समस्या उद्भवतात. अशा वेळी, काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
advertisement
- WHO च्या मते, यासाठी आहार योग्य घेणं खूप महत्वाचं आहे.
- यासाठी जेवणात कमीत कमी मीठ असेल याची खात्री करा. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानं उच्च रक्तदाब होतो.
- वजन कमी करणं महत्वाचं आहे. वजन कमी केल्यानं रक्तदाब कमी होऊ शकतो.
- कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल न केल्यानं उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं महत्वाचं आहे. काही व्यायाम आणि योगासनं नक्की करा.
advertisement
- तंबाखू किंवा दारूचं सेवन करत असाल तर ते सोडून द्या.
- आहारात अधिक फळं आणि भाज्यांचा समावेश करा.
- ताण कमी करणं देखील खूप महत्वाचं आहे. ताण व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा.
- रक्तदाब नियमितपणे तपासत राहा.
- प्रदूषित हवेपासून दूर रहा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 26, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
High BP : WHO नं सांगितलेल्या टिप्स नक्की वाचा, BP नियंत्रणात ठेवणं होईल सोपं











