advertisement

Gas Saving Tips : इंडियन ऑइलने सांगितल्या गॅस वाचवण्याच्या भन्नाट टिप्स! 'या' पद्धतीनं वाचतील तुमचे पैसे..

Last Updated:

Indian oil gives effective tips to save LPG : स्वयंपाकाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही गॅस, वेळ आणि पैसे वाचवू शकता. यासाठी इंडियन ऑइलने अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी युक्त्या सांगितल्या आहेत.

या युक्त्यांनी वाचवू शकता गॅस..
या युक्त्यांनी वाचवू शकता गॅस..
मुंबई : गॅसचा तुटवडा असो किंवा नसो, पण गॅसची बचत करणं ही नेहमीचीच एक चांगली सवय आहे. कारण यामुळे गॅस जास्त खर्च होत नाही आणि त्यामुळे आपले पैसेही वाचतात. काही अत्यंत सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही स्वयंपाक पूर्ण करून शकता. यासाठी तुम्हाला काही जास्तीची मेहनत घ्यावी लागणार नाही. उलट तुमचा वेळच वाचेल.
स्वयंपाकाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही गॅस, वेळ आणि पैसे वाचवू शकता. यासाठी इंडियन ऑइलने अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी युक्त्या सांगितल्या आहेत. चला पाहूया याबद्दल सविस्तर माहिती.
या युक्त्यांनी वाचवू शकता गॅस..
- इंडियन ऑइलच्या मते, जेव्हा तुम्ही गॅसवर पाणी किंवा कोणतेही द्रव पदार्थ शिजवता तेव्हा ते एकदा उकळल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा. कारण त्यानंतरही गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यास अन्न लवकर शिजत नाही, उलट गॅस वाया जातो. फ्लेम कमी केल्याने तुम्ही जवळपास 25% गॅस वाचवू शकता.
advertisement
- आपल्याकडे पातेल्यात शिजवलेल्या भाज्यांना प्राधान्य दिलं जातं. काही लोकांचं मात्र असतं की, कुकरमधल्या भाज्यांना चव येत नाही. पण हे चुकीचं आहे. उलट कुकर वापरल्याने अन्न चांगलं शिजतं, लवकर बनतं आणि गॅसचीही बचत होते. कुकर वापरून तुम्ही 20 ते 40 टक्क्यांपर्यंत गॅस वाचवू शकता.
- हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्याला सर्वात जास्त वेळ डाळी आणि कडधान्य शिजवायला लागतो. अशावेळी हर ते काही काळ आधीपासून भिजवून ठेवले तर ते बऱ्यापैकी मऊ होतात आणि ते शिवण्यासाठी गॅस कमी लागतो. तुम्हाला चणे बनाव्याचे आतील तर ते रात्रभर भिजवा यामुळे सकाळी ते बनवताना जवळपास 22% गॅस वाचेल.
advertisement
advertisement
- त्यासोबत अन्न नेहमी झाकून शिजवा. यामुळे वाफेवर अन्न शिजतं, कमी वेळात बनतं आणि गॅस वाचतो. नेहमी झाकण अन्न शिजवल्याने उष्णता आणि वाफ टिकून राहते. यामुळे अन्न लवकर शिजतं.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gas Saving Tips : इंडियन ऑइलने सांगितल्या गॅस वाचवण्याच्या भन्नाट टिप्स! 'या' पद्धतीनं वाचतील तुमचे पैसे..
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement