advertisement

साताऱ्याहून मुंबईकडे निघालेला ट्रक, पुण्याजवळ अचानक ब्रेक फेल अन् भीषण अपघात, महामार्गावर मृत्यूचा थरार

Last Updated:

साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने हा ट्रक (क्रमांक MH 14 HG 9803) जात होता. दरीपुलाजवळ आल्यावर ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने 'ट्रक रस्त्यावरील इतर वाहनांवर जाऊन आदळला.

अपघातात चालकाचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
अपघातात चालकाचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : शुक्रवारी पहाटे एका भीषण अपघाताने खळबळ उडवून दिली. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरीपुलाजवळ एक भीषण अपघात झाला. इथे एका ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून, मदतनीस जखमी झाला आहे.
कसा घडला हा अपघात?
मृत चालकाचे नाव नासिर मोहम्मद शाह मोहम्मद चौधरी (वय ३६) असे आहे, तर जखमी मदतनीस अर्जुन दीपक मौर्य (वय २८) असून, दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने हा ट्रक (क्रमांक MH 14 HG 9803) जात होता. दरीपुलाजवळ आल्यावर ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने 'ट्रक रस्त्यावरील इतर वाहनांवर जाऊन आदळला. हा अपघात इतका भीषण होता की चालक गंभीर जखमी झाला आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले.
advertisement
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने नन्हे येथील 'सिल्वर बर्च हॉस्पिटल'मध्ये हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती चालक नासिर चौधरी यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. आंबेगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
advertisement
महामार्गावरील अपघातांची मालिका पाहता, चालकांनी आपल्या वाहनांची नियमित तपासणी करणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा या घटनेने अधोरेखित केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
साताऱ्याहून मुंबईकडे निघालेला ट्रक, पुण्याजवळ अचानक ब्रेक फेल अन् भीषण अपघात, महामार्गावर मृत्यूचा थरार
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement