ई-रिक्षा आणि बाईक धारकांसाठी 'ही' गोष्ट असणं अनिर्वाय; परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय
Last Updated:
New License Rules : ई-रिक्षा आणि बाईक चालकांसाठी एक गोष्ट बंधनकारक करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नियमांचे पालन वाढेल आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्षा तसेच टॅक्सींसाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली होती. मात्र सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा तसेच ई-बाईकसाठी आता परिवहन विभागाकडे नोंदणी करुन परवाना घेणे अनिर्वाय करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे.
निर्णय का घेण्यात आला?
आतापर्यंत ई-रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती नव्हती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी परवाना नसतानाही ई-रिक्षा प्रवासी वाहतूक करत असल्याचे दिसून येत होते.पंरतू आता राज्यात ई-वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या वाहनांवरही नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या अधिसूचना क्रमांक का. आ. 2812 (अ) 30 जून 2016 नुसार प्रवासी वाहतूकीसाठी एकसमान नियम लागू करण्यात यावा साठी ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवाना प्रक्रिया अनिवार्य करण्यात येणार आहे. या घेतलेल्या निर्णायामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा अशा सर्व वाहनांसाठी समान नियम लागू होतील.
advertisement
सरनाईक यांनी सांगितले की, या घेतलेल्या निर्णयामागचा एकच महत्त्वाचा उद्देश आहे की, प्रवासी वाहतुकीत पारदर्शकता आणणे आणि अनियमितता रोखणे हा आहे. तसेच परवाना प्रक्रिया सोपी करण्यासाठी परिवहन विभागाकडून एक खिडकी योजना सुरू करण्याची तयारीही करण्यात येत आहे.
या योजनेत अर्ज स्वीकारणे तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी करण्यात येईल. त्यामुळे चालकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी परवाना घेणे अनिवार्य राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 10:47 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ई-रिक्षा आणि बाईक धारकांसाठी 'ही' गोष्ट असणं अनिर्वाय; परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय








