Mumbai News : मुंबईकर प्रवाशांची वणवण थांबणार, मेट्रो प्रशासनाचा मास्टर प्लॅन आला समोर
Last Updated:
Mumbai Metro Update : मुंबईकर आता मेट्रोने प्रवास करणं अधिक सोयीस्कर होणार आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांचा विचार करता एक नवा निर्णय घेतलेला आहे.
मुंबई : मुंबई शहरात गेल्या काही वर्षात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. या प्रवाशांचा प्रवास अजून सोपा करण्यासाठी एक नवा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय
मेट्रो स्थानकाचे जाळे संपू्र्ण मुंबई शहरात विस्तारत असताना भुयारी मेट्रोही सुरु झालेली आहे. मात्र भुयारी मेट्रोमधून प्रवाशांची संख्या अत्यंत कमी दिसत असल्याने भुयारी मेट्रोकडे जास्तीत जास्त प्रवाशांना वळवण्यासाठी मेट्रो स्थानकांबाहेर आता प्रवशांना रिक्षा सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. यात विशेष म्हणजे प्रवाशांना आधीच बुकींग करता येईल किंवा स्थानकाबाहेर जाताच साधारण रिक्षाही पकडता येणार आहे.
advertisement
'या' मेट्रो स्थानकांबाहेर उपलब्ध होणार रिक्षा सेवा
ही रिक्षा सेवा प्रवाशांना सीप्झ स्थानकाच्या ए 1 प्रवेशव्दाराजवळ तर एमआयडीसी अंधेरी येथे ए 1, बी 2, बॅणड्रा कॉलनी येथे ए 1 तसेच ए 2 मिळेल तसेच बी 2 मध्ये,बीकेसी स्थआनकाच्या ए 1,ए4, बी1 या प्रवेशव्दारांजवळ उपलब्ध असणार आहे. एवढेच नाही तर आधीच बुक केलेल्या रिक्षांसह बाकी रिक्षाही या ठिकाणी उभ्या असतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.
advertisement
प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी कोणत्या सुविधा?
गेल्या काही महिन्यांपूर्वी भुयारी मेट्रो स्थानकातून प्रवाशांसाठी फीडर बससेवा सुरु करण्यात आली. ज्यात वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुख्य स्थानकांबाहेर सिटीफ्लो या खासगी कंपनीच्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.
कसा आहे यांचा रुट?
1) मेट्रो स्थानकाबाहेरु सुरु करण्यात आलेल्या या बसेस बीकेसी मेट्रो स्थानकावरुन एनएसी आणि जिओ गार्डनर तर वन बीकेसी तसेच कौटुंबिक न्यायालय या प्रमुख मार्गावरुन जाते.
advertisement
2)वरळी येथील बससेवा ही सेंच्युरी मिल्स आणि वन इंडिया बुल्स सेंटर तर कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क या ठिकाणी तर सीएसएमटी येथून जात असलेली बस ओल्ड कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी.मुखर्जी चौक, के.सी. कॉलेज आणि चर्चेगेट मेट्रो स्थानक येथे जाते. यात काही मेट्रो स्थानकांबाहेर उबेर या खासगी कंपनीच्या टॅक्सीसेवाही प्रवाशांसाठी उपलद्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 10:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईकर प्रवाशांची वणवण थांबणार, मेट्रो प्रशासनाचा मास्टर प्लॅन आला समोर








