स्वामीभक्तांसाठी सुवर्णयोग; पुण्यात पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थांच्या सूर्यमणी, पादुकांचे दर्शन, कधी आणि कुठं?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Swami Samarth: हिंदू नववर्षाच्या शुभ दिनानिमित्ताने तसेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर हा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पुणे: श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या पवित्र सूर्यमणी आणि पादुकांचे दर्शन घेता येणार आहेत. या पवित्र वस्तू आजही महाराजांच्या लीलांशी जोडलेल्या आहेत आणि भक्तांच्या श्रद्धेचा मुख्य भाग आहेत. या पवित्र सूर्यमणी आणि पादुका दर्शनासाठी 17 मार्च आणि 18 मार्चला संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत, तर 19 मार्चला सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सिद्धी साज बँक्वेट, डी. पी. रस्ता, एरंडवणे याठिकाणी भक्तांना या पवित्र वस्तू दर्शन घेता येणार आहेत.
अक्कलकोटचे राजे मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) आणि डॉ. महेश नामपूरकर यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यमणी व पादुकांचे दर्शनासाठी ठेवून या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा पवित्र सोहळा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मठ तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भेट देत पुढे कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहे.
advertisement
हिंदू नववर्षाच्या शुभ दिनानिमित्ताने तसेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर हा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात प्रथमच होत असलेल्या या पवित्र सूर्यमणी आणि पादुका दर्शनाचा लाभ पुणेकरांनी तसेच स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांनी स्वामींच्या सूर्यमणी आणि पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सहभागी व्हावे, असेही सांगण्यात आले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 10:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
स्वामीभक्तांसाठी सुवर्णयोग; पुण्यात पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थांच्या सूर्यमणी, पादुकांचे दर्शन, कधी आणि कुठं?










