कसा होतो डान्स योगा चा फायदा?
डान्स योगा किंवा म्युझिक योगाचा शरीरासाठी चांगला फायदा होतो. प्रशिक्षक निकिता या डान्स योगाचा त्यांना स्वतःला झालेला फायदा देखील सांगतात. त्यामुळे मोठ्या संख्येने वर्धेकर वजन कमी करण्यासाठी पहाटे साडेपाच ते सात वाजेपर्यंत मोठया उत्साहात प्रात्यक्षिके करताना दिसून येत आहेत. डान्सिंग योगा किंवा म्युझिक योगाच्या माध्यमातून शरीराला फायदा होतो. योगा नृत्यामुळे थायरॉईड, ब्लड प्रेशर, वजन वाढलेले कमी करणे किंवा पॅरेलेसिस, हातपाय दुखणे अशा प्रकारच्या अनेक शारीरिक समस्यांवर आराम मिळतो, असे प्रशिक्षक बुरांडे सांगतात.
advertisement
पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर डाय वापरणं किती सुरक्षित?
महिलांसह पुरुष वर्गही होतोय सहभागी
योगाच्या माध्यमातून सर्वांनी शारीरिक आणि मानसिक रित्या स्वस्थ राहण्याची गरज आहे. त्यासाठी वर्ध्याच्या आयटीआय टेकडीच्या परिसरात म्युझिक योगा प्रशिक्षक निकिता बुरांडे या मार्गदर्शन करत आहेत. वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय. महिलांसह पुरुष वर्ग देखील वजन कमी करण्यासाठी म्युझिक योगासाठी हजेरी लावतोय. झुम्बा स्टेप्स करून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे हळूहळू वर्धेकरांची संख्या याठिकाणी वाढताना दिसते आहे.
नागरिकांना झुंबा किंवा योगा नृत्य करण्याचे फायदे कळल्यानंतर अनेकजण या स्टेप्स करत आहेत. तसेच शरीरासाठी होणारे योगाचे फायदे समजून घेत आहे. जेणेकरून त्याचा फायदा हा आपल्या निरोगी आयुष्यासाठी मदतीचा ठरेल. त्यामुळे आपणही निरोगी आरोग्यासाठी हा डान्सिंग योगा नक्की ट्राय करू शकता.





