TRENDING:

Orange Peel : त्वचा फ्रेश दिसण्यासाठी नैसर्गिक उपाय, त्वचा होईल खोलवर स्वच्छ

Last Updated:

संत्र्याची साल ताज्या दह्यात मिसळली जाते तेव्हा ती त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएटर बनवते. संत्र्याच्या सालीत असलेलं व्हिटॅमिन सी आणि दह्यात असलेलं लॅक्टिक एसिड एकत्रितपणे त्वचा खोलवर स्वच्छ करतात आणि मृत त्वचा काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा नवीन दिसून येते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : त्वचा फ्रेश दिसण्यासाठी अनेक उपाय करुन झाले असतील आणि मनासारखा बदल दिसत नसेल तर एक नैसर्गिक उपाय नक्की करुन पाहा. कधी गोड, कधी आंबट संत्र हे आवडतं फळ. संत्र खाऊन झाल्यानंतर, संंत्र्याचं सालही तब्येतीसाठी उपयुक्त ठरतं. कारण संत्र्याची साल त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे.
News18
News18
advertisement

संत्र्याचं साल ताज्या दह्यात मिसळलं तेव्हा ती त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएटर बनवते. संत्र्याच्या सालीत असलेलं व्हिटॅमिन सी आणि दह्यात असलेलं लॅक्टिक एसिड एकत्रितपणे त्वचा खोलवर स्वच्छ करतात आणि मृत त्वचा काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा नवीन दिसून येते.

कसा बनवायचा संत्र्याच्या सालांचा पॅक ?

साहित्य: वाळलेल्या संत्र्याची साल पावडर बनवण्यासाठी बारीक करा. प्रमाण एक टीस्पून, ताजं दही - एक टीस्पून

advertisement

पद्धत:

हे दोन्ही घटक एका भांड्यात मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. दहा - पंधरा मिनिटं सुकू द्या. यानंतर, हलक्या हातांनी मालिश करताना कोमट पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा  याचा वापर करा.

Typhoid : पावसाळ्यात ओळखा आजारांचा धोका, वेळीच व्हा सावध

संत्र्याच्या साली आणि दह्याच्या फेसपॅकचे फायदे -

advertisement

1. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते - संत्र्याच्या सालीत असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे त्वचा उजळते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.

2. डाग आणि टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त - या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि सूर्यप्रकाशामुळे होणारं नुकसान देखील कमी होतं. यासोबतच, पिंपल्सचे डाग देखील कमी होऊ लागतात.

3. मुरुम कमी करण्यासाठी उपयुक्त - संत्र्याच्या सालीत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुम वाढण्यापासून रोखतात.

advertisement

Scrub : ऋतू कुठलाही असो, त्वचेची नीट काळजी घ्या, स्क्रबिंगनं होईल त्वचा स्वच्छ

4. सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त - या पॅकचा नियमित वापर केल्यानं त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्या हळूहळू कमी होऊ लागतात.

5. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी एक वरदान: हा पॅक अतिरिक्त तेल शोषून घेतो, ज्यामुळे त्वचा मॅट आणि ताजी दिसते.

advertisement

ही खबरदारी नक्की घ्या:

- त्वचा खूप संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा.

- दही ताजं असावं, आंबट नसावं.

- आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा वापरू नका, 2-3 वेळा वापरणं पुरेसं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Orange Peel : त्वचा फ्रेश दिसण्यासाठी नैसर्गिक उपाय, त्वचा होईल खोलवर स्वच्छ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल