TRENDING:

Uttanasan : खूप वेळ बसून काम करताय ? ब्रेकमधे हे योगासन करा, तुम्हाला वाटेल फ्रेश

Last Updated:

उत्तनासनामुळे शरीराला बळकटी मिळते आणि मन ताजंतवानं होतं. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, उत्तानासन या योगासनामुळे शरीराच्या अनेक भागांना ताणलं जातं. जे लोक बराच वेळ बसून राहतात किंवा संगणकावर काम करतात त्यांच्यासाठी हे आसन खूप फायदेशीर ठरते. हे आसन शरीराच्या अनेक भागांना ताणून स्नायूंना आराम देतं आणि विशेषतः पोटऱ्या, मांडी, कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत करतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवसभर चांगली ऊर्जा मिळत राहावी यासाठी चांगला आहार, व्यायाम आवश्यक आहे. यातलाच एक प्रकार योगाभ्यासाचा. योग हा केवळ व्यायाम नाही तर शरीर आणि मनाला एकत्र जोडण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. शरीर निरोगी ठेवण्याबरोबरच मानसिक शांतीसाठीही योगासनं महत्त्वाची आहेत. योगाचा सराव केल्यानं आपली ऊर्जा अबाधित राहते आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. या योगातील अनेक आसनांपैकी एक म्हणजे 'उत्तनासन'.
News18
News18
advertisement

उत्तनासनामुळे शरीराला बळकटी मिळते आणि मन ताजंतवानं होतं. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, उत्तानासन या योगासनामुळे शरीराच्या अनेक भागांना ताणलं जातं. जे लोक बराच वेळ बसून राहतात किंवा संगणकावर काम करतात त्यांच्यासाठी हे आसन खूप फायदेशीर ठरते. हे आसन शरीराच्या अनेक भागांना ताणून स्नायूंना आराम देतं आणि विशेषतः पोटऱ्या, मांडी, कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत करतं.

advertisement

Liver : यकृतासाठी या उत्तम पदार्थांशी करा दोस्ती, फॅटी लिव्हरला करा बायबाय

- मानसिक ताण कमी करण्यासाठी उपयुक्त

उत्तनासनामुळे मानसिक ताण कमी होतो. उत्तानासन केल्यानं मन शांत होण्यास मदत होते. हे आसन करतो तेव्हा शरीराच्या खालच्या भागातून रक्त मेंदूकडे वेगानं जातं. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

advertisement

- डोकेदुखी आणि निद्रानाश

उत्तनासन डोकेदुखी आणि निद्रानाशात देखील फायदेशीर आहे. हे आसन करताना आपण आपलं शरीर पुढे वाकवतो तेव्हा मेंदूमध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं, ज्यामुळे डोकेदुखी कमी होते आणि ताण कमी होऊन चांगली झोप येण्यास मदत होते.

- पचनासाठी फायदेशीर

उत्तनासनामुळे पचनसंस्था देखील मजबूत होतं आणि अन्न लवकर पचतं. हे आसन करताना पोट आणि पोटाभोवतीचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

advertisement

- स्नायूंना बळकटी

उत्तनासन हे मांड्या आणि गुडघे मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचं आसन आहे. हे आसन करताना आपण खाली वाकतो तेव्हा स्नायूंवर दबाव येतो. यामुळे सांधेदुखी इत्यादींपासून आराम मिळतो आणि शरीराचं संतुलन देखील सुधारतं.

Hair Care : केसांसाठी घरगुती जेलचा पर्याय, तांदूळ - जवस करतील जादू

उत्तानासन करण्याची योग्य पद्धत

advertisement

उत्तनासन करण्यासाठी, प्रथम सरळ उभं रहा आणि दोन्ही हात कंबरेवर ठेवा. यानंतर, एक दीर्घ श्वास घ्या आणि कंबर वाकवून हळूहळू पुढे वाका. हातांनी पायाचे घोटे धरा आणि पाय एकमेकांना समांतर आणि सरळ ठेवा.

तीस सेकंद ते एक मिनिट या स्थितीत रहा. शेवटी, हळूहळू श्वास सोडा आणि पुन्हा सरळ उभं रहा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

हे योगासन करताना काही खबरदारी घेणं देखील आवश्यक आहे. पाठीला किंवा कंबरेला दुखापत झाली असेल तर उत्तानासन करू नका. तसंच, सायटिकासारख्या समस्या असलेल्यांसाठी हे आसन सक्तीनं निषिद्ध आहे, कारण यामुळे वेदना वाढू शकतात. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे योगासन करू नका.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Uttanasan : खूप वेळ बसून काम करताय ? ब्रेकमधे हे योगासन करा, तुम्हाला वाटेल फ्रेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल