advertisement

Hair Care : केसांसाठी घरगुती जेलचा पर्याय, तांदूळ - जवस करतील जादू

Last Updated:

हेअर मास्क, हेअर स्पा, हेअर थेरपी असे बरेच पर्याय असतात तसंच केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, एक जेल घरच्या घरी तयार करणं शक्य आहे. घरगुती वस्तूंपासून बनवलेलं हे हेअर जेल केसांवर मास्कसारखं लावता येतं. यामुळे कोरडे केस मऊ होतात. ही रेसिपी विशेषतः कुरळ्या केसांसाठी चांगली आहे.

News18
News18
मुंबई : बदलत्या ऋतूंनुसार, केसांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण केस गळण्याच्या समस्या देखील वाढतायत. हेअर मास्क, हेअर स्पा, हेअर थेरपी असे बरेच पर्याय असतात तसंच केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, एक जेल घरच्या घरी तयार करणं शक्य आहे. घरगुती वस्तूंपासून बनवलेलं हे हेअर जेल केसांवर मास्कसारखं लावता येतं. यामुळे कोरडे केस मऊ होतात. ही रेसिपी विशेषतः कुरळ्या केसांसाठी चांगली आहे.
केस मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी सांगितलेला मास्क घरी देखील बनवू शकता आणि लावू शकता.
या हेअर जेलमुळे कुरळे केस पूर्वीपेक्षा अधिक आटोपशीर राहू शकतात. तसंच, केस रेशमी आणि चमकदार बनतात. हेअर जेल बनवण्यासाठी सुमारे चार ग्लास पाणी घ्यावं लागेल. या पाण्यात चार चमचे तांदूळ आणि चार चमचे जवस घाला.
advertisement
हे मिश्रण नीट उकळवा. पाणी चार ग्लासऐवजी दोन ग्लास होईपर्यंत उकळवा. हे तांदूळ आणि जवसाचं जेल गरम असतानाच गाळून घ्या आणि एका कंटेनरमध्ये ठेवा. तांदूळ आणि जवसाच्या बियांपासून बनवलेलं हे जेल शॅम्पू करण्यापूर्वी केसांना लावता येतं.
advertisement
शॅम्पू करण्यापूर्वी हे जेल केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकांपर्यंत लावण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हे जेल डोक्यावर अर्धा तास तसंच राहू द्या आणि नंतर धुवा. केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. या जेलनं केस कुरळे दिसणार नाहीत आणि खूप मऊ होतील.
हे जेल एकाच वेळी भरपूर बनवण्याऐवजी फक्त दोन वेळा बनवा. हे जेल जास्त दिवस ठेवलं तर त्याचा वास येऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : केसांसाठी घरगुती जेलचा पर्याय, तांदूळ - जवस करतील जादू
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement