Vitamin B12 : व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष नको, शाकाहारींसाठी हे आहेत व्हिटॅमिन बी 12 पूरक पर्याय

Last Updated:

शुद्ध शाकाहारी असाल आणि तुम्हाला वारंवार थकवा, चक्कर येणं, विसरणं किंवा हातपायांत मुंग्या येणं यासारख्या समस्या जाणवत असतील, तर तुमच्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असण्याची शक्यता आहे, असं डॉ. सलीम झैदी यांनी या व्हिडिओत सांगितलं आहे. अशावेळी, प्रथम रक्त तपासणी करा आणि नंतर या नैसर्गिक उपायांनी ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. बी 12 ची कमतरता खूप तीव्र असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

News18
News18
मुंबई : शरीराची निगा राखणं आणि रोजच्या नवीन दिवसासाठी स्वत:ला तयार ठेवणं हे एक मोठं आव्हान आहे. यासाठी योग्य आहार, व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यावर शरीर नावाचं मशीन सुरु असतं. पण सध्या खाण्याच्या बदलत्या सवयी आणि जीवनशैलीतल्या बदलांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. विशेषतः, शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. या पोषक तत्वांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी 12. हे विशेष जीवनसत्व आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे.
डीएनए निर्मितीबरोबरच, रक्त तयार करणं, मज्जासंस्थेचं आरोग्य राखणं आणि शरीराला ऊर्जा देणं यासारखी अनेक महत्त्वाची कार्य व्हिटॅमिन बी12 मुळे शक्य होतात. त्याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणं, स्मरणशक्ती कमकुवत होणं, हातपायांत मुंग्या येणं आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
पण, व्हिटॅमिन बी 12 चा मुख्य स्रोत मांसाहारी अन्न आहे. त्यामुळे, ही कमतरता शाकाहारींमधे सर्वात जास्त दिसून येते. तुम्हालाही ही कमतरता जाणवत असेल तर ही माहिती उपयुक्त आहे. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी शाकाहारींसाठी काही पदार्थ सुचवले आहेत. कुठलंही औषध न घेता व्हिटॅमिन बी 12ची कमतरता भरून काढू शकतात.
advertisement
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
शाकाहारींसाठी दूध हे व्हिटॅमिन बी 12 चा सर्वोत्तम स्रोत आहे. दैनंदिन गरजेच्या 50-70% फक्त एक ग्लास फुल क्रीम दुधानं पूर्ण करता येते. याशिवाय, दही, पनीर, चीज आणि मठ्ठा हे देखील चांगले पर्याय आहेत. त्यामुळे, शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला डॉ. सलीम यांनी दिला आहे.
advertisement
- हिरव्या पालेभाज्या
या सर्वांव्यतिरिक्त, पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या, तसंच बीट, मशरूम आणि गाजर यासारख्या भाज्यांमधेही थोड्या प्रमाणात बी 12 असू शकतं असं डॉक्टर झैदी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या भाज्या दैनंदिन आहारात असाव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे.
advertisement
- अंडी
काही जण मुख्य आहार शाकाहारी करतात आणि मांसाहारात केवळ अंड खातात. त्यामुळे तुम्ही जर अंडी खात असाल तर व्हिटॅमिन बी 12 साठीचा आणखी एक चांगला स्रोत उपलब्ध आहे. एका अंड्यात सुमारे 0.6 मायक्रोग्राम बी 12 असतं. दिवसातून 2-3 अंडी खाल्ल्यानं व्हिटॅमिन बी 12 ची मोठी गरज पूर्ण होऊ शकते. पण यात एक गोष्ट  लक्षात ठेवा की व्हिटॅमिन बी 12 बहुतेकदा अंड्याच्या पिवळ्या भागात असतं, म्हणून संपूर्ण अंड खा.
advertisement
शुद्ध शाकाहारी असाल आणि तुम्हाला वारंवार थकवा, चक्कर येणं, विसरणं किंवा हातपायांत मुंग्या येणं यासारख्या समस्या जाणवत असतील, तर तुमच्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असण्याची शक्यता आहे, असं डॉ. सलीम झैदी यांनी या व्हिडिओत सांगितलं आहे. अशावेळी, प्रथम रक्त तपासणी करा आणि नंतर या नैसर्गिक उपायांनी ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. बी 12 ची कमतरता खूप तीव्र असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin B12 : व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष नको, शाकाहारींसाठी हे आहेत व्हिटॅमिन बी 12 पूरक पर्याय
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement