बाडमेर : अनेकजण दररोज दूध पितात. दुधातून शरिराला भरपूर पोषक तत्त्व मिळतात. मात्र ब्रेकफास्ट, लंच की डिनर, दूध पिण्यासाठी सर्वात चांगली वेळ कोणती माहितीये? याबाबत डॉ. पंकज अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.
डॉक्टरांनी सांगितलं, ब्रेकफास्टनंतर दूध प्यायल्यास शरीर ऊर्जावान राहतं. दुधात भरपूर प्रोटिन्स आणि कॅल्शियम असतात. ज्यामुळे सकाळी मेटाबॉलिज्म वाढतं. तसंच सकाळी दूध प्यायल्यानं पोट सुदृढ राहतं.
advertisement
हेही वाचा : Street food lovers पावसाळ्यात जरा आवरा, पाणीपुरीच ठरू शकते घातक!
तर, लंचनंतर दूध प्यायल्यास पचनक्रिया मंदावते. दूध जड असल्यानं ते पचायला वेळ लागतो. दुपारच्या वेळी ते प्यायल्यास सुस्ती येते. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड होतं. तसंच काहीजणांना सकाळी दूध प्यायल्यानंही त्रास होऊ शकतो. पोटदुखी, गॅस किंवा अपचनाचा सामना करावा लागू शकतो.
डॉक्टर सांगतात की, डिनरनंतर दूध पिणं सर्वोत्तम. त्यामुळे झोप चांगली लागते आणि शरिराला आराम मिळतो. रात्री ग्लासभर दूध गरम करून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.