रायबरेली : पोटात पौष्टिक पदार्थ गेले की आरोग्य उत्तम राहतं. त्यात वातावरण बदलताच साथीचे आजार जडतात. सध्या सर्वत्र पावसाला सुरूवात झाली असली तरी उन्हाचा तडाखा मात्र कायम आहे. अशावेळी आपल्या शरिरात गारवा असणं आवश्यक आहे. यासाठी आज आपण एक उत्तम ड्रिंक पाहूया.
काकडी वर्षाचे 12 महिने आरोग्यासाठी उपयुक्त असते. काकडीत असे अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. विशेषतः काकडीचे काप घातलेलं पाणी प्यायल्यास पोटात गारवा निर्माण होतो. दररोज उपाशीपोटी हे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं.
advertisement
हेही वाचा : Dark Circles: डोळ्यांभोवतीचे काळे घेर पूर्ण होतील नष्ट! घरच्या घरी करा सोपा उपाय
डॉक्टर आकांक्षा दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडीत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. शिवाय काकडी रसाळही असते. यात फ्लेवोनॉइड्स, टॅनिन, लिगनेन, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय यात 99 टक्के पाणी असतं.
काकडीचं पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, वजन कमी होण्यासाठी, त्वचा सुदृढ राहण्यासाठी, अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी आणि हृदयाला रोगांपासून वाचवण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरतं. हे पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी काकडी व्यवस्थित धुवून घ्यावी. मग काकडीची साल काढून तिचे बारीक काप करावे. हे काप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यावं. त्यामुळे शरीर छान थंड राहील.