Dark Circles: डोळ्यांभोवतीचे काळे घेर पूर्ण होतील नष्ट! घरच्या घरी करा सोपा उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डार्क सर्कल्स बऱ्याचदा आपल्या सौंदर्यात अडथळे ठरतात. डार्क सर्कल्समुळे आपला चेहरा झोपाळू आणि थकलेला दिसतो, शिवाय वयही जास्त दिसू शकतं. अनेकजण डार्क सर्कल्स घालवण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेतात. परंतु आराम काही मिळत नाही. त्यामुळे आज आपण घरच्या घरी डार्क सर्कल्स कसे घालवायचे, यासाठी काही खास रामबाण, सोपे उपाय पाहणार आहोत. (अकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली बदाम तेलाच्या काही थेंबांनी व्यवस्थित मालिश करावी. 15 दिवसांच्या या उपायाने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत मिळते.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.