TRENDING:

Hair fall : केसगळती रोखण्यासाठी औषधं नाही, आधी आहारात बदल करा, लोहाची कमतरता असू शकतं कारण

Last Updated:

केस अचानक गळायला लागले तर तब्येतीकडे तुम्ही दुर्लक्ष करता आहात हे स्पष्ट आहे. कारण केशतज्ज्ञांच्या मते, अचानक केस गळतीचं सर्वात सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित केलेलं कारण म्हणजे अशक्तपणा. भारतीय लोकसंख्येच्या जवळजवळ ऐंशी टक्के लोकांमधे लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आढळतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

आणखी एक गोष्ट म्हणजे, केस अचानक गळायला लागले तर तब्येतीकडे तुम्ही दुर्लक्ष करता आहात हे स्पष्ट आहे. कारण केशतज्ज्ञांच्या मते, अचानक केस गळतीचं सर्वात सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित केलेलं कारण म्हणजे अशक्तपणा. भारतीय लोकसंख्येच्या जवळजवळ ऐंशी टक्के लोकांमधे लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आढळतो.

Malasana : पचनसंस्थेसाठी उत्तम आसन, महिलांसाठी विशेष फायदेशीर, ही माहिती नक्की वाचा

advertisement

हेल्थ एक्स्पर्ट अंजली मुखर्जी यांच्या मते, लोहाची कमतरता याकडे कायम दुर्लक्ष केलं जातं. केसांच्या पोषणासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण, लोहामुळे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत होते. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळणार नाही, ज्यामुळे केस कुपोषित राहतात आणि गळतात. अशावेळी केस गळण्याचा वेग आणि प्रमाण जास्त लागतात.

advertisement

Cough : सर्दीवर रामबाण आयुर्वेदिक उपाय, अशा पद्धतीनं वाफ घ्या, सर्दी होईल गायब

यावर त्यांनी काही उपाय सांगितले आहेत. केसांसाठी किंवा संपूर्ण आरोग्यासाठी तुम्ही काय खाता, तुमच्या पोटात कोणते घटक जातात याकडे लक्ष देणं सर्वात जास्त गरजेचं आहे. यासाठी अन्न किंवा पूरक आहाराद्वारे लोहाचं सेवन वाढवलं तर केस गळती नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतं.

advertisement

अंजली मुखर्जींच्या मते:

लोहयुक्त पदार्थांचं सेवन वाढवा - पालक, मसूर, खजूर आणि भोपळ्याच्या बिया

या घटकांच्या चांगल्या शोषणासाठी लोह आणि व्हिटॅमिन सी एकत्र करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

गरज पडली तर सप्लिमेंट्स घ्या, पण यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. योग्य तपासणीशिवाय हे करु नका असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair fall : केसगळती रोखण्यासाठी औषधं नाही, आधी आहारात बदल करा, लोहाची कमतरता असू शकतं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल