Summer Health Drink : नारळ पाण्यानं घालवा अशक्तपणा, उन्हाळ्यात तब्येत राहिल चांगली
आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार,
- उन्हाळ्यात मसालेदार अन्न खाऊ नये - मसालेदार अन्नामुळे शरीर डिहायड्रेट होतं.
- उन्हाळ्यात चयापचयाचा वेग कमी होतो, याचा आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो.
- उन्हाळ्यात जास्त खाल्लं तर पोट फुगणं, आम्लपित्त अशा पोटाशी संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात.
advertisement
- या समस्या टाळण्यासाठी, उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं रक्तदाबावरही परिणाम होतो.
- उन्हाळ्यात गोड पदार्थ खाऊ नयेत कारण यामुळे शरीर डिहायड्रेट होतं.
- उन्हाळ्यात काहींचं वजनही खूप वाढतं कारण, उष्णतेपासून वाचण्यासाठी शेक प्यायला जातो पण त्यात भरपूर साखर असते.
- या ऋतूत थंड पेय पिण्याचं प्रमाण खूप वाढतं. यातल्या साखरेमुळे वजन वाढतं. शेकमध्ये साखर असेल तर पिणं टाळा.
Summer Care: उन्हाळ्यात फळांचा रस देईल ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल, रक्तवृद्धीसाठीही उपयुक्त
- बाहेर उपलब्ध असलेल्या शेकमध्ये कोणत्या प्रकारचं दूध वापरलं जात याविषयी माहिती नसते, बऱ्याचदा त्यात मिश्रित रंग वापरले जातात.
- या दिवसात बाहेरचं अन्न खाल्ल्यानं वजन तर वाढेलच पण पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.
- उन्हाळ्यात सॅलड खाणं प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात, आहारात फायबर खाण्याचं प्रमाणं वाढवावं. सॅलडद्वारे शरीरात द्रवपदार्थ जातील.
- ऋतू कोणताही असो, हंगामी भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. तसंच अन्न शिजवताना त्यात जास्त मीठ आणि साखर वापरू नये असा सल्लाही डॉक्टर देतात.