Summer Care: उन्हाळ्यात फळांचा रस देईल ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल, रक्तवृद्धीसाठीही उपयुक्त

Last Updated:

उन्हाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि रक्ताची कमतरता देखील निर्माण होऊ शकते. या काळात प्रकृती चांगली राखण्यासाठी फळांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. फळांच्या रसांमध्ये, बीट आणि डाळिंब फायदेशीर आहेत.

News18
News18
मुंबई: उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याव्यतिरिक्त फळांच्या रसांचा उपयोग होतो. यात बीट की डाळिंबाचा रस उन्हाळ्यात फायदेशीर असतात. उन्हाळ्यात उष्णता आणि थकवा तसंच शरीरात पाण्याची कमतरता अशा समस्या जाणवतात.
उन्हाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि रक्ताची कमतरता देखील निर्माण होऊ लागते. या काळात प्रकृती चांगली राखण्यासाठी फळांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. फळांच्या रसांमध्ये, बीट आणि डाळिंब कसे फायदेशीर आहेत पाहूया.
बीटाचा रस -
  • बीटामध्ये भरपूर लोह आढळतं. बीटाचा रस हिमोग्लोबिन वाढीसाठी चांगला आहे. उन्हाळ्यात शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीटाचा रस खूप फायदेशीर आहे.
  • भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्यानं हा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • बीटमध्ये नायट्रेट्स आढळतात, यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम होतं.
  • हा रस प्यायल्यानं वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते.
  • अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असल्यानं बीटाच्या रसात त्वरित ऊर्जा प्रदान करण्याची शक्ती असते. शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा शरीर कमकुवत वाटत असेल तर या रसामुळे त्वरित ऊर्जा मिळते.
  • बीटामध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते.
  • त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी बीटाचा रस चांगला पर्याय आहे. यकृताच्या निरोगी आयुष्यासाठी बीट उपयुक्त आहे.
  • बीटाच्या रसामुळे चयापचय वाढतं आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
advertisement
डाळिंबाचा रस -
  • डाळिंबाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
  • डाळिंब खाण्यासोबतच डाळिंबाचा रस देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी डाळिंबाचा रस फायदेशीर आहे.
  • व्हिटॅमिन सी असल्यानं डाळिंबाच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण होतं.
  • डाळिंबाचा रस पचन सुधारण्यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करतो.
  • हृदयरोग असेल तर डाळिंबाचा रस खूप फायदेशीर आहे.
  • डाळिंबाचा रस त्वचेसाठी खूप प्रभावी आहे, यातल्या गुणधर्मांमुळे त्वचा तरुण दिसते.
  • डाळिंबाच्या रसात आढळणारे पॉलीफेनॉल रक्तदाब नियंत्रित करण्यासोबतच शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
  • डाळिंबाच्या रसामुळे मानसिक आरोग्य आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो.
  • त्वरित ऊर्जा मिळवायची असेल तर डाळिंबाच्या रसाऐवजी बीटाचा रस प्यावा. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी डाळिंबाच्या रसापेक्षा बीटाचा रस जास्त फायदेशीर आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care: उन्हाळ्यात फळांचा रस देईल ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल, रक्तवृद्धीसाठीही उपयुक्त
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement