Budh Gochar 2025: चित्रा नक्षत्रात बुध गोचर! आशा-अपेक्षा सोडलेली असताना या 3 राशींचे भाग्य उजळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. ज्या लोकांना बुध ग्रहाचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात खूप सकारात्मकता येते. बुध लवकरच गोचर करणार आहे. बुध ग्रह, जो बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यवसायाचे प्रतीक मानला जातो, जेव्हा चित्रा नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा विविध राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारे परिणाम होतो. चित्रा नक्षत्र हे मंगळाच्या मालकीचे असून, ते कला, सौंदर्य आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा बुध या नक्षत्रात गोचर करतो, तेव्हा त्याचे परिणाम या क्षेत्रांशी संबंधित असतात.
advertisement
advertisement
वृषभ - चित्रा नक्षत्रात बुध ग्रहाचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. वृषभेची माणसं यामुळे मानसिकदृष्ट्या मजबूत असतील आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये दिलासा मिळेल. मनातलं बोलण्याचा संकोच दूर होईल. जीवनसाथीसोबत पारदर्शकता आणि विश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढेल. पैसे कमविण्याचे आणखी मार्ग सापडतील.
advertisement
सिंह - बुधाच्या गोचरामुळे सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ होतील. कामात आत्मविश्वास वाढेल. सिंह राशीच्या लोकांचा कामात, बोलण्यात आत्मविश्वास असेल. बुद्धिमत्ता आणि समज वाढेल. काळ काहीसा आव्हानात्मक असेल पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधून काढू शकाल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग सापडतील. सामाजिक आदर वाढेल.
advertisement
कन्या - कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण विशेषतः फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे मिळतील आणि नोकरीत पदोन्नती मिळू शकेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल राहील आणि कामाच्या ठिकाणी आपल्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक होईल. कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होईल.
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाच्या संक्रमणाचा विशेष फायदा होईल. तूळेच्या विवाहित लोकांना जीवनात आनंद आणि प्रेम वाढेल. मानसिक ताण कमी होईल. खाण्या-पिण्याकडं विशेष लक्ष द्यावं. संपत्ती वाढीचे मार्ग उघडतील आणि खर्च कमी होतील. योगा किंवा व्यायाम केल्यानं लाभ मिळतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)