Govind Barge Case: पूजाने गोविंदरावांचा 'पिंजरा' केला, 7 लाखांचा प्लॉट नावावर केल्याचा पुरावा समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
आता वैराग पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार आहे.
सोलापूर : बीडमधील गेवराई येथील लुखामसलाचे माजी सरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे दररोज नव नवीन माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. गोविंद बर्गे यांनी नर्तिक पूजा गायकवाड हिच्यावर कशाप्रकारे पैशांची उधळण आणि जमिनी नावावर केल्यात याचा पुरावा आता समोर आला आहे. जानेवारी २०२५ मध्ये बर्गे यांनी पूजा गायकवाडला तब्बल ७ लाख रुपयांची जमीन नावावर करून दिली होती.
कला केंद्रात नाचणाऱ्या नर्तिक पूजा गायकवाड सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. शनिवारी तिची पोलीस कोठडी संपणार आहे. पोलिसांच्या तपासून एक धक्कादाक माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडला जमीन घेऊन दिल्याची माहिती उघड झाली आहे. वैराग येथे पावणे दोन गुंठे प्लॉट पूजा गायकवाडच्या नावावर केला होता.
advertisement
विशेष म्हणजे, या व्यवहारात खुद्द गोविंद बर्गे हे साक्षीदार होते. पूजा गायकवाड हिच्या नावावर जमीन केल्यानंतर साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांची सही आहे. वैराग इथं सात लाख रुपयांत पावणेदोन गुंठे जमीन नावावर केली आहे. पूजा गायकवाड हिच्यासह तिचा भाऊ प्रशांत गायकवाड हा ही साक्षीदार असल्याचं जमीन खरेदी विक्री दस्तकात निष्पन्न झालं आहे. 

advertisement
आता वैराग पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार आहे. गोविंद बर्गे यांनी 9 सप्टेंबर रोजी पूजा गायकवाड हिच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. पूजा गायकवाड हिला सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल दिला होता. एवढंच नाहीतर बीडमधील घर नावावर करण्यासाठी पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडे तगादा लावला होता. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी पूजा गायकवाड हिची शनिवारी पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे आता तिला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 12, 2025 11:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Govind Barge Case: पूजाने गोविंदरावांचा 'पिंजरा' केला, 7 लाखांचा प्लॉट नावावर केल्याचा पुरावा समोर