पोलंडच्या हवाई हद्दीत रशियन घातक ड्रोन शिरले, युरोपात खळबळ; युद्ध थेट NATOच्या दारात, भीतीचं सावट

Last Updated:

Europe War: रशियाच्या स्वस्त ड्रोननी पोलंडच्या हवाई सीमेवर थेट घुसखोरी केली आणि NATOच्या महागड्या मिसाईल शिल्डला पूर्णपणे आव्हान दिले. या घटनेनंतर युरोपातील देशांनी तातडीने यूक्रेनकडून इंटरसेप्टर ड्रोन खरेदीची शर्यत सुरू केली आहे.

News18
News18
कीव : रशियाच्या ड्रोन हल्ल्यांनी आता थेट नाटोच्या रणनीतीला आव्हान दिले आहे. 10 सप्टेंबरला रशियन कामिकाझे ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीत घुसले तेव्हा युरोपला प्रथमच जाणवले की अब्जावधी डॉलर्स खर्च करून उभारलेली त्यांची महागडी क्षेपणास्त्रविरोधी ढाल स्वस्त मशीनांसमोर निष्प्रभ ठरत आहे. यानंतर जर्मनी, डेन्मार्क, पोलंड आणि बाल्टिक देशांनी युक्रेनमध्ये तयार होणारे इंटरसेप्टर ड्रोन खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
advertisement
युरोपची वाढती चिंता
कीव इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार या हल्ल्यापूर्वीच युरोपियन राजधानीत युक्रेनच्या तंत्रज्ञानात गुंतवणुकीबाबत चर्चा सुरू होती. मात्र पोलंडमध्ये घडलेल्या ड्रोन घुसखोरीने त्या चर्चांना वेग दिला. एका युरोपीय लष्करी राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले, आम्हाला युद्धासाठी तयार राहावे लागेल. हा काळ युक्रेनकडून शिकण्याचा आहे.
advertisement
युक्रेनमधील डिफेन्स अॅडव्हायजरी कंपनी Triada Trade Partners ला हल्ल्यानंतर काही तासांतच पोलंड, जर्मनी आणि डेन्मार्ककडून चौकशीचे फोन आले. कंपनीच्या विश्लेषण विभागाचे प्रमुख बोहदान पोपोव म्हणाले, रशियाने दाखवून दिले की नाटो देशांवर हल्ला करण्यास त्याला भीती वाटत नाही. आता प्रत्येक देश उपाय शोधत आहे.
advertisement
युक्रेनचे ड्रोन का खास?
आत्तापर्यंत पाश्चिमात्य देशांनी अब्जावधी डॉलर्स अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालींवर खर्च केले. या प्रणाली क्रूझ किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यात तर प्रभावी आहेत. परंतु १० ते १५ हजार डॉलर्स किंमतीच्या रशियन ड्रोनच्या सैन्यासमोर आर्थिकदृष्ट्या तोकड्या ठरत आहेत.
advertisement
पोलंडवरील हल्ल्यावेळी नाटोला जबरदस्तीने $400,000 किंमतीच्या Sidewinder क्षेपणास्त्रांचा मारा करावा लागला. ही महागडी शस्त्रे रशियाच्या स्वस्त ‘गर्बेराडमी ड्रोनना (प्लायवूड आणि फोमपासून बनवलेल्या) खाली पाडण्यासाठी वापरली गेली. उलट, युक्रेनचे इंटरसेप्टर ड्रोन म्हणजे साध्या क्वाडकॉप्टरना विस्फोटकांनी सज्ज केलेले केवळ $5,000 मध्ये तयार होतात. हे ड्रोन वेगवान, उंच उड्डाणक्षम आणि घातक हल्ल्यांत पारंगत आहेत.
advertisement
नाटोची तातडीची कारवाई
10 सप्टेंबरची घटना नाटो व रशिया यांच्यातील थेट भिडंतीचा पहिला प्रसंग मानला जात आहे. नाटो प्रमुख मार्क रुटे यांनी पुष्टी दिली की त्या दिवशी पोलंडच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी डच F-35, पोलिश F-16, इटालियन AWACS, नाटो टँकर आणि जर्मन Patriot क्षेपणास्त्रे सज्ज करण्यात आली होती. पण परिणाम असा झाला की, काही हजार डॉलर्स किमतीच्या रशियन ड्रोनना पाडण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रे झोकून द्यावी लागली.
advertisement
क्रेमलिनचा नवा संदेश
दरम्यान क्रेमलिनने शांतता चर्चेबाबत नवे वक्तव्य जारी केले. प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले, चर्चेचे मार्ग खुले आहेत, पण सध्या संवाद थांबलेला आहे. युक्रेनमधील तंत्रज्ञानाचा लष्करी वापर आणि रशियन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युरोपची डोकेदुखी वाढत आहे. पुढील काळात हा संघर्ष किती व्यापक होईल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/विदेश/
पोलंडच्या हवाई हद्दीत रशियन घातक ड्रोन शिरले, युरोपात खळबळ; युद्ध थेट NATOच्या दारात, भीतीचं सावट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement