पोट दुखतंय म्हणून चिमुकल्याला डॉक्टरांकडे नेलं, X-Ray मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनाही फुटला घाम

Last Updated:

11 वर्षीय मुलाला सुरुवातीला सौम्य पोटदुखी आणि थोडीशी सूज जाणवली. पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टरांनी साधी जुलाबची औषधं दिली आणि घरी पाठवलं. पण त्रास कमी होण्याऐवजी वाढत गेला.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : लहान मुलं अनेकदा खेळण्यात इतकी गुंतून जातात की त्यातून काही अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडतात. कधी कधी त्यांच्या खेळण्यामधून अशा गोष्टी समोर येतात ज्या पालक, नातेवाईक आणि अगदी डॉक्टरांनाही चकित करून टाकतात. मुलांची उत्सुकता ही नैसर्गिक असली तरी तिचे परिणाम गंभीर ठरू शकतात. असाच एक आश्चर्यचकित करणारा प्रकार नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.
कियान नावाच्या 11 वर्षीय मुलाला सुरुवातीला सौम्य पोटदुखी आणि थोडीशी सूज जाणवली. पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टरांनी साधी जुलाबची औषधं दिली आणि घरी पाठवलं. पण त्रास कमी होण्याऐवजी वाढत गेला. अखेर डॉक्टरांनी पुढे एक्स-रे करण्याचा सल्ला दिला. एक्सरे काढताच डॉक्टरांना त्यात जे दिसलं ते थक्क करून सोडणारं होतं.
एक्स-रे रिपोर्ट पाहताच डॉक्टरही अवाक झाले. कियानच्या पोटात तब्बल 100 ग्रॅम वजनाची सोन्याची वीट अडकलेली होती. चौकशीत मुलाने सांगितलं की त्याने खेळता-खेळता ती गिळली होती. यानंतर पालकांनी तातडीने त्याला सूजौ विद्यापीठाच्या बाल रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
डॉक्टरांचा धाडसी निर्णय
सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की धातू नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडेल. मात्र दोन दिवस उलटूनही काही फरक न पडल्याने आंतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आणि धोका वाढला. अशा स्थितीत तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूजौ येथील प्रमुख वैद्यकीय केंद्रातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून कियानच्या पोटातून सोन्याची वीट सुरक्षितरीत्या बाहेर काढली. मुलगा आता पूर्णपणे बरा आहे आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हा प्रकार चिन मधील आहे, जो आधी तेथील सोशल मीडियावर व्हायरल झाला, नंतर त्याला कोणीतरी रेडिटवर ही शेअर केलं. लहान मुलं असलेल्या लोकांना सतर्क रहाण्याचा सल्ला दिला जात आहे.
मराठी बातम्या/Viral/
पोट दुखतंय म्हणून चिमुकल्याला डॉक्टरांकडे नेलं, X-Ray मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनाही फुटला घाम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement