शाळेमध्ये आला 'सायलेंट किलर', 11 वर्षांच्या मुलीसोबत अघटित घडलं, खेळता-खेळताच प्राण सोडले
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शाळेमध्ये खेळत असतानाच 11 वर्षांच्या सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेमध्ये पीटीचा तास सुरू असताना मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती.
शाळेमध्ये खेळत असतानाच 11 वर्षांच्या सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेमध्ये पीटीचा तास सुरू असताना मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती, तेव्हा अचानक तिला थकवा जाणवू लागला, त्यामुळे ती जमिनीवर बसली आणि काही क्षणांमध्येच कोसळली. या विद्यार्थिनीचा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विद्यार्थिनी जमीनीवर कोसळल्याचं लक्षात येताच तिच्या मैत्रिणींनी ताबडतोब शिक्षकांना बोलावलं, यानंतर शिक्षकांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. इंदूरच्या बेतमा भागामध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. विद्यार्थिनी कोसळल्यानंतर तिला शिक्षकांनी बेतमा रुग्णालयात नेले, पण तिथल्या डॉक्टरांनी मुलीला इंदूरच्या चोईथराम रुग्णालयात न्यायला सांगितलं, पण उपचार मिळण्याआधीच मुलीने जीव सोडला होता.
advertisement
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार डॉक्टरांनी मुलीला जिवंत करण्याचा प्रयत्न केला, पण संध्याकाळी 5 वाजता तिला मृत घोषित करण्यात आलं. 'जेव्हा तिला रुग्णालयात आणलं गेलं, तेव्हा तिचा मृत्यू झालेला होता. आम्ही तिला जिवंत करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तिला वाचवता आलं नाही. शाळेत असतानाच ती कोसळल्याचं आम्हाला विद्यार्थी आणि कुटुंबियांनी सांगितलं. आम्ही पोलिसांना या घटनेची माहिती दिली', असं डॉक्टर म्हणाले आहेत.
advertisement
मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला, यानंतर तिथे पोस्टमार्टम करण्यात आलं आणि नंतर कुटुंबाला मृतदेह परत देण्यात आला. लक्षिता असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. लक्षिताचे वडील दिलीप पटेल एका खासगी कंपनीमध्ये काम करतात, तसंच तिची आई गृहिणी आहे. लक्षिताचा मोठा भाऊ बिजलपूरमध्ये नातेवाईकांसोबत राहतो. लक्षिताच्या अचानक मृत्यूमुळे शाळेतील तिच्या मैत्रिणी आणि शिक्षकांना धक्का बसला आहे.
advertisement
कुटुंबातील कुणालाच हृदयाशी संबंधित समस्यांचा इतिहास नव्हता, पण लक्षिताचे वजन तिच्या वयाच्या तुलनेमध्ये खूपच जास्त होते. लक्षिताचे वय 74 किलो होते, हे तिच्या हृदयाशी संबंधित समस्येचं कारण असू शकतं, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
September 12, 2025 11:24 PM IST
मराठी बातम्या/देश/
शाळेमध्ये आला 'सायलेंट किलर', 11 वर्षांच्या मुलीसोबत अघटित घडलं, खेळता-खेळताच प्राण सोडले