Summer Care: उष्माघात, डिहायड्रेशनचा धोका ओळखा, पुरेसं पाणी प्या आणि या गोष्टी विसरु नका

Last Updated:

उन्हाची झळ देशाच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात जाणवते आहे. तीव्र उष्णतेमुळे उन्हाळ्यात उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका खूप वाढतो. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्या घातक ठरू शकतात.

News18
News18
मुंबई: उन्हाळा वाढतोय, उन्हाची झळ देशाच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात जाणवते आहे. तीव्र उष्णतेमुळे उन्हाळ्यात उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका खूप वाढतो. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्या घातक ठरू शकतात.
या दिवसांत, शरीराचं तापमान खूप वाढतं. तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, उलट्या होणं, अशक्तपणा आणि बेशुद्ध पडणं ही उष्माघाताची लक्षणं आहेत. उष्माघाताप्रमाणेच डिहायड्रेशनचा त्रासही या दिवसात जाणवतो. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असणं. यामुळे थकवा येणं, अशक्तपणा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
दररोज चा लीटर पाणी प्या - उन्हाळ्यात या समस्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, शरीर हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे. दररोज किमान तीन ते चार लीटर पाणी प्या. याशिवाय नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, कलिंगड, काकडी, पपई अशी ताजी आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खा.
दुपारी घराबाहेर पडणं टाळा -
गरज नसेल तर दुपारी घराबाहेर पडू नका. बाहेर जात असाल तर हलके, सुती आणि सैल कपडे वापरा. घराबाहेर पडताना सनस्क्रीन वापरा आणि जास्त शारीरिक श्रम करणं टाळा. बाहेरून परतल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका, प्रथम शरीराचं तापमान सामान्य होऊ द्या, त्यानंतरच पाणी प्या.
advertisement
मसालेदार अन्न खाणं टाळा -
बाहेर जाणार असाल तर रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. तसंच तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. बाहेर तळलेले आणि मसालेदार अन्न खाल्ल्यानं शरीरातील उष्णता वाढू शकते. म्हणूनच, घरी शिजवलेलं अन्न खा. हे अन्न हलकं, पचायला सोपं आणि थंडावा देणारं असेल. तसंच, गोड आणि अल्कोहोलयुक्त पेयं टाळा, यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं.
advertisement
उष्माघात झाल्यास काय करावं ?
उष्माघाताची लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब सावलीच्या ठिकाणी जा, थंड पाण्यानं शरीर थंड करा आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. शरीर ताजंतवानं राहण्यासाठी आणि उष्णतेशी लढण्याची चांगली क्षमता  राहावी यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. या उपायांचा अवलंब नक्की करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care: उष्माघात, डिहायड्रेशनचा धोका ओळखा, पुरेसं पाणी प्या आणि या गोष्टी विसरु नका
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement