Summer Health : उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी, संसर्गाचा धोका ओळखा

Last Updated:

उन्हाळ्यात आरोग्यावर परिणाम होतात, या ऋतूत चक्कर येणं, डोळे जळजळणं, डिहायड्रेशन यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे ऊन वाढतंय म्हणून केवळ पंखे आणि एसीवर अवलंबून राहू नका तर उष्णतेनुसार आहार आणि दिनचर्या योग्य असेल तर तब्येत चांगली राहिल. 

News18
News18
मुंबई :  उन्हाळ्यात काही आजारांचा धोका वाढतो. कडक उन्हामुळे, घामामुळे त्रासून वैताग येतो. या हवेत योग्य काळजी घेतली नाही तर आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. योग्य खबरदारी घेतली नाही तर उष्णतेमुळे अनेक लहान-मोठे आजार होऊ शकतात.
उन्हाळ्यात आरोग्यावर परिणाम होतात, या ऋतूत चक्कर येणं, डोळे जळजळणं, डिहायड्रेशन यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे ऊन वाढतंय म्हणून केवळ पंखे आणि एसीवर अवलंबून राहू नका तर उष्णतेनुसार आहार आणि दिनचर्या योग्य असेल तर तब्येत चांगली राहिल.
उन्हाळ्याचा आरोग्यावर होणारा परिणाम -
चक्कर येणं : उष्णतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणं यासारख्या समस्या जाणवतात. आधीच मानसिक ताण किंवा चिंताग्रस्त असलेल्यांना उष्णतेचा परिणाम आणखी जाणवतो. यासाठी पुरेसं पाणी पिणं, लिंबू, मीठ, साखर घालून पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
डोळ्यांची जळजळ : तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि संसर्ग होऊ शकतो. बाहेर जाताना, गॉगल वापरा आणि शक्य तेव्हा डोळे धुणं गरजेचं आहे.
घसा कोरडा होणं:  जास्त धूळ, प्रदूषण आणि घामामुळे उष्णतेचा परिणाम नाक आणि घशावरही परिणाम होतो. हे भाग कोरडे होऊ शकतात किंवा त्यात संसर्ग होण्याची शक्यता असते. पाण्याअभावी घसा वारंवार कोरडा पडतो आणि खोकला किंवा घसा खवखवणं सुरू होतं.
advertisement
चिडचिड: उन्हाळ्यात झोपेची समस्या काहींना जाणवते. रात्रीही तापमान जास्त असेल तर झोप पूर्ण होत नाही.  यामुळे चिडचिड होते आणि थकवा जाणवतो.
पोटाचं आरोग्य: उन्हाळ्यात अन्न पचवणं थोडं कठीण होतं. अन्नबाधा, उलट्या आणि जुलाब होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे बाहेरचं खाणं शक्य तितकं टाळावं. घरी बनवलेलं हलकं आणि ताजं अन्न खाणं चांगलं.
advertisement
त्वचेवरही परिणाम: उष्णतेचा त्वचेवरही थेट परिणाम होतो. पुरळ, खाज येणं, उष्णतेमुळे पुरळ येणं हे त्रास उन्हामुळे जाणवतात. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणं महत्वाचं आहे.
संसर्ग: जास्त घाम आणि धुळीमुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे बूट आणि मोजे घालताना पाय स्वच्छ आहेत का तपासून पाहा. बूट - मोज्यांमुळे पाय बराच वेळ बंद राहतात आणि त्यामुळे संसर्ग वाढू शकतो. पायांना दुर्गंधी येत असेल किंवा खाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
शरीर हायड्रेटेड ठेवा: उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. कमी पाणी प्यायल्यानं शरीरात अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून या ऋतूत दिवसभर पुरेसं पाणी पिणं, नारळ पाणी पिणं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खाणं खूप उपयुक्त आहे. घराच्या बाहेर बराच वेळ राहणार असाल तर सोबत पाणी, जमलं तर लिंबू पाणी, इलेक्ट्रॉल पावडर ठेवा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Health : उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी, संसर्गाचा धोका ओळखा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement