Summer Care : मधुमेही रुग्ण उन्हाळ्यात खाऊ शकतात कमी GI असलेली फळं, साखरेची पातळी राहिल नियंत्रणात

Last Updated:

उन्हाळ्यात कमी GI असलेली फळां मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे. ही फळं संतुलित प्रमाणात खाल्ल्यानं प्रकृती निरोगी आणि उत्साही राहते.

News18
News18
मुंबई : मधुमेही रुग्णांनी कोणती फळं खावीत हा नेहमीचा प्रश्न असतो. उन्हाळ्यात कमी GI असलेली फळं खाणं मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित पर्याय आहे. ही फळं संतुलित प्रमाणात खाण्यानं प्रकृती निरोगी राहील. योग्य फळांची निवड केल्यानं उन्हाळ्यात गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि GI म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं रक्तातील साखरेची पातळीही वाढणार नाही.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेली फळं रक्तातील साखर हळूहळू वाढवतात, ज्यामुळे मधुमेहींसाठी ही फळं सुरक्षित पर्याय आहेत. काही फळांमुळे रक्तातली साखर वेगानं वाढते. त्यामुळे मधुमेहींनी जीआय खूप कमी असणारी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेही रुग्णांसाठी 5 आरोग्यदायी फळं -
advertisement
1. सफरचंद
सफरचंद हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स (सुमारे 36) असलेलं फळ आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सफरचंद फायदेशीर आहे. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, यामुळे पचन सुधारतं आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.
2. जांभूळ
जांभूळ हे उन्हाळ्यात हमखास मिळणारं फळ. जांभळाचा जीआय अंदाजे 25 असतो. रक्तातील साखर नियंत्रित करणं तसंच यातले अँटीऑक्सिडंट्स पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात.
advertisement
3. संत्र
व्हिटॅमिन सी असलेल्या संत्र्याचा GI सुमारे 40 आहे. संत्र्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि उन्हाळ्यात यामुळे उत्साही वाटतं.
4. नाशपती / पेर
नाशपातीचा जीआय सुमारे 38 असतो आणि त्यात भरपूर फायबर असतं, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. उन्हाळ्यात हा एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे.
advertisement
5. पपई
पपईचा जीआय सुमारे 60 असतो. मधुमेहींसाठीही पपई सुरक्षित आहे. पपईमुळे पचन सुधारतं आणि शरीराला थंडावा मिळतो.
मधुमेही रुग्णांसाठी महत्त्वाच्या टिप्स
कोणतंही फळ मर्यादित प्रमाणात खा.
खूप गोड किंवा साखरयुक्त फळं टाळा.
फळं खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : मधुमेही रुग्ण उन्हाळ्यात खाऊ शकतात कमी GI असलेली फळं, साखरेची पातळी राहिल नियंत्रणात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement