Summer Drink : उन्हाच्या तलखीतून वाचण्यासाठी हे पर्यायही लक्षात ठेवा, पारंपरिक उपायांचा होईल उपयोग

Last Updated:

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून आवश्यक खनिजं आणि पाणी वेगानं बाहेर पडतात. त्यामुळे स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचं आहे. पण उन्हाळ्यात गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजं भरून काढण्यासाठी पाणी नेहमीच पुरेसं नसतं. अशावेळी पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं हा चांगला पर्याय आहे.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्यात शरीर हायड्रेट करण्यासाठी पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण अपुऱ्या पाण्यामुळे डिहायड्रेशन झालं तर तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाणी हा शरीरासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर इतर पेयांमुळेही शरीराला आवश्यक आर्द्रता मिळते. यामुळे भर उन्हाळ्यातही ऊर्जावान वाटतं. यासोबतच, आवश्यक खनिजं आणि इलेक्ट्रोलाइट्स देखील यातून मिळतात.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून आवश्यक खनिजं आणि पाणी वेगानं बाहेर पडतात. त्यामुळे स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचं आहे. पण उन्हाळ्यात गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजं भरून काढण्यासाठी पाणी नेहमीच पुरेसं नसतं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात मीठ, साखर आणि पोषक घटक आवश्यक असतात, हे घटक दरवेळा पाण्यातून मिळू शकत नाहीत.
advertisement
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी आणखी पर्याय -
1. नारळ पाणी प्या -
नारळ पाणी ही निसर्गानं दिलेली देणगी आहे. या नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पेयामध्ये शरीराला त्वरित हायड्रेट करण्याची आणि थकवा दूर करण्याची क्षमता आहे. त्यात पोटॅशियम आणि सोडियमसारखी खनिजं असतात, यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
2. ताजी फळं खा -
टरबूज, संत्री आणि काकडी यांसारख्या हंगामी फळांमधून हायड्रेशन मिळतं तसंच जीवनसत्त्व आणि अँटिऑक्सिडंट्सही मिळतात. शरीराला ताजंतवानं ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
advertisement
3. इलेक्ट्रोलाइट्स असलेली पेयं -
उन्हाळ्यात, घामासोबत सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीरातून बाहेर पडतात. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी, घरी बनवलेलं लिंबू पाणी किंवा लिंबू, मीठ, साखर घालून पाणी प्या.
4. सूप आणि ताक -
ताकामध्ये प्रोबायोटिक्स आणि खनिजं असतात, ज्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. विविध भाज्या घालून बनवलेल्या सूपमधूनही हायड्रेशन मिळतं.
advertisement
5. भरपूर पाणी असलेल्या भाज्या आणि फळं खा -
टोमॅटो, पपई, टरबूज, काकडी यांसारखी फळं आणि भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते. याचा सॅलडमध्ये वापर करा.
या टिप्स लक्षात ठेवा -
कॅफिन आणि अल्कोहोल टाळा: यामुळे शरीरातील पाणी काढून टाकलं जातं आणि डिहायड्रेशन होऊ शकतं.
advertisement
जास्त तळलेले पदार्थ खाणं टाळा: उन्हाळ्यात यामुळे शरीरावर अतिरिक्त भार पडतो. या पदार्थांमुळे पचन व्यवस्थेवरचा ताण वाढतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Drink : उन्हाच्या तलखीतून वाचण्यासाठी हे पर्यायही लक्षात ठेवा, पारंपरिक उपायांचा होईल उपयोग
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement