Summer Diet : उन्हाळ्यासाठी डाएट टिप्स, बाहेरचं अन्न खाणं टाळा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात घरचं, हलकं, सकस अन्न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. ऋतू कोणताही असो, आहारात प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण वाढवा. प्रथिनांसाठी आहारात डाळी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. फायबरसाठी म्हणजेच तंतुमय घटक वाढवण्यासाठी आहारात सॅलडचा समावेश करणं प्रकृतीसाठी आवश्यक आहे.
मुंबई : उन्हाळ्यात शरीर निरोगी राहण्यासाठी आहार कसा असावा यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत डॉ. समीर भाटी यांच्या अभ्यासानुसार, भारतातील अन्नात कार्बोहायड्रेट्सचा म्हणजेच कर्बोदकांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. आपल्या जेवणात मुख्यत्वे पोळी भाजी किंवा वरण भात असतो. तसंच गोड पदार्थही खाल्ले जातात. उन्हाळ्यात घरचं, हलकं, सकस अन्न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
आहारतज्ज्ञांनी नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार,
- ऋतू कोणताही असो, आहारात प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण वाढवा.
- प्रथिनांसाठी आहारात डाळी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
- फायबरसाठी म्हणजेच तंतुमय घटक वाढवण्यासाठी आहारात सॅलडचा समावेश करा.
advertisement
- स्नायूंच्या आरोग्यासाठी फायबर - प्रथिनं या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
- आहारात प्रथिनं आणि तंतुमय घटक असतील तर कर्बोदकं तिसऱ्या क्रमांकावर येतात. त्यामुळे या क्रमानं आहारातले घटक ठरवता येतील.
- जास्त प्रमाणात चपाती आणि भात खाण्यानं स्नायूंचं आरोग्य सुधारणार नाही.
- आहारात पोळी भाजीपेक्षा डाळी, कडधान्यं, भाकरी, ताक, भाज्या असाव्यात.
- उन्हाळ्यात ज्या भाज्या - फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा भाज्या - फळांना प्राधान्य द्यावं.
- उन्हाळ्यात पचायला जड पदार्थ, तेलकट, प्रोसेस्ड फूड खाणं टाळा.
- नारळाचं पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत, काकडी, फळांचा समावेश आहारात करा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 05, 2025 6:44 PM IST