अल्मोडा : आजकालच्या धावपळीच्या जगात कधी आपल्यासमोर असा प्रसंग येईल की, आपलं डोकं दुखायला लागेल काही सांगता येत नाही. बऱ्याचदा असं होतं, डोकं दुखल्यावर आपण मेडिकलमध्ये जातो आणि त्यावर गोळी घेतो किंवा त्यासाठी आधीच आपण घरी गोळ्या-औषधं आणून ठेवलेले असतात. परंतु असं करणं आरोग्यासाठी हानीकारक आहे. कारण त्यामुळे डोकेदुखी तात्पुरती थांबू शकते पण तिच्यावर मूळापासून आराम मिळत नाही. शिवाय डोकेदुखी नेमकी कशामुळे होतेय तो त्रास वाढतच जातो.
advertisement
उत्तराखंडमधील अल्मोडाचे डॉक्टर हरीश चंद आर्य सांगतात की, डोकेदुखीची वेगवेगळी कारणं असतात, मायग्रेन, चष्म्याचा नंबर बदलणं, ब्लड प्रेशर वाढणं, सर्दी-खोकला किंवा जास्त विचार केल्यानेसुद्धा डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे त्यावर योग्य औषधं घेणं आवश्यक असतं.
(वातावरण बदलताच पडता आजारी? असं कधीपर्यंत चालणार, आता 'या' 3 सवयी लावून घ्याच!)
मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर उलटीसारखं वाटतं, डोळ्यांपुढे काही क्षणांसाठी अंधार पसरतो. डोक्याचा एकच भाग प्रचंड दुखतो. तर, ब्लड प्रेशर वाढल्यामुळेसुद्धा डोकं दुखतं, त्यासाठी वेळोवेळी ब्लड प्रेशर तपासण्याची आवश्यकता असते. तसंच आपण चष्मा वापरत असाल आणि त्याचा नंबर कमी किंवा जास्त झाला असेल तर त्यामुळेसुद्धा डोकेदुखी होते.
(Six Pack पाहिजे? Gym सोबत फॉलो करा या टिप्स, मुली Body बघून बोलतील Wow...)
डॉक्टर आर्य यांनी सांगितलं की, आजकाल टेन्शन हेच डोकेदुखीचं सर्वात मोठं कारण आहे. सध्या प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. अशात विद्यार्थ्यांना अभ्यासाचं टेन्शन असतं, नोकरदारवर्गाला पगाराचं टेन्शन असतं, व्यावसायिकांना नफ्याचं टेन्शन असतं, तर प्रत्येकाला पैशांचं टेन्शन, नातेसंबंधांबाबत टेन्शन अशा वेगवेगळ्या ताण-तणावामुळे डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी मनाला, मेंदूला शांतता हवी असते. त्यासाठी योगासनं करावी, व्यायाम करावा, धान्यसाधना करावी आणि सिगरेट, दारू अशा नशेच्या पदार्थांपासून दूर राहावं.
एकूणच असह्य डोकेदुखी असेल, तर घरच्या घरी उपाय करण्यापेक्षा, स्वतः गोळ्या घेण्यापेक्षा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतरच आपल्या डोकेदुखीचं नेमकं कारण कळतं आणि त्यावर अचूक उपाय करता येतात.