TRENDING:

गेलेले केस परत येतच नाहीत? तुमच्या किचनमध्येच आहे उपाय, जरा करून बघा!

Last Updated:

हा असा सोपा उपाय आहे, ज्यामुळे तुमच्या केसांचा केवळ पोत सुधारणार नाही, तर टक्कलही गायब होईल. महत्त्वाचं म्हणजे हा उपाय जास्त खर्चिकही नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
अनेक आशियाई देशांमध्ये प्राचीन काळापासून हा उपाय केला जातो.
अनेक आशियाई देशांमध्ये प्राचीन काळापासून हा उपाय केला जातो.
advertisement

रायबरेली : केस हा सौंदयातला एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे आपले केस छान मऊ, लांबसडक असावे असं जवळपास प्रत्येक महिलेला वाटतं. तसंच पुरुषांसाठीही काळेभोर, घनदाट केस महत्त्वाचे असतात. परंतु आजकाल प्रदूषण एवढं वाढलंय की, शरिराला नको नको ते आजार जडतात. त्यात सकाळपासूनच्या धावपळीत वेळच्या वेळी जेवणंही कठीण होतं. व्यायाम करायलासुद्धा वेळ मिळत नाही. याच सवयींचा केसांवर, त्वचेवर दुष्परिणाम दिसून येतो. केस गळणं ही एक सर्वसामान्य समस्या आहे. परंतु तरुणपणात टक्कल पडायला लागणं ही चिंतेची बाब असू शकते. अनेकजण घनदाट केस मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात, महागडे प्रॉडक्ट्स वापरतात. काहीजण घरगुती रामबाण उपाय करतात, परंतु काही केल्या गेलेले केस परत येतच नाहीत. त्यामुळे वाढते ती फक्त चिंता पण आता काळजी करू नका.

advertisement

आज आपण एक असा सोपा उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या केसांचा केवळ पोत सुधारणार नाही, तर टक्कलही गायब होईल. महत्त्वाचं म्हणजे हा उपाय जास्त खर्चिकही नाही. अगदी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या रोजच्या जेवणातल्या पदार्थाचा हा उपाय आहे.

(ओठांचा काळसरपणा जाता जाईना? आता शेवटचा उपाय म्हणून 'हे' कराच)

उत्तर प्रदेशच्या रायबरेतील आयुर्वेदिक डॉक्टर स्मिता श्रीवास्तव (बीएएमएस आयुर्वेद) सांगतात की, जपान आणि चीनसारख्या अनेक आशियाई देशांमध्ये प्राचीन काळापासून हा उपाय केला जातो. आपल्या जेवणातल्या महत्त्वाच्या पदार्थांपैकी एक आहे तांदूळ. ज्यात आरोग्यपयोगी अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यांचा केसांनाही प्रचंड फायदा होतो.

advertisement

(सतत विचार, डोकं फुटायची वेळ येते? ही डोकेदुखी साधी नाही, गोळीवर भागवू नका!)

नेमका उपाय काय?

आपण तांदळापासून भात बनवून खातो. तांदळाच्या पाण्यात असे अनेक व्हिटॅमिन्स, अमिनो ऍसिड आणि मिनरल्स असतात ज्यामुळे केसगळती मूळापासून कमी होते. भात बनवताना तांदूळ धुवत असाल तर ते पाणी एका भांड्यात ठेवा. आंघोळीच्या वेळी या पाण्याने केस धुवा. तसंच भांड्यात तांदूळ शिजवताना त्यावर जे पाणी येतं ते एका बशीत काढा आणि केसांमध्ये लावा. त्यामुळे केस मजबूत होतील. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे केस लांबसडक आणि काळभोर होतील.

advertisement

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
गेलेले केस परत येतच नाहीत? तुमच्या किचनमध्येच आहे उपाय, जरा करून बघा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल