TRENDING:

थंडगार पाणी प्यायल्यानं जीव सुखावतो, काळीज नाही! Heart Attack येण्याची सुरुवात इथूनच होते

Last Updated:

ही झाली एक सवय, परंतु आता आपल्या जीवनशैलीत अशा अनेक चुकीच्या सवयी आहेत ज्यांचे आपल्या शरिरावर धोकादायक परिणाम होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिखा श्रेया, प्रतिनिधी
नकळत आपल्याकडून आरोग्याबाबत काही चुका होतात.
नकळत आपल्याकडून आरोग्याबाबत काही चुका होतात.
advertisement

रांची : दिवसाढवळ्या घराबाहेर पडलं की, चालता चालता मध्येच धाप लागते, थकवा येतो. आता काहीतरी थंडगार प्यावं किंवा गोड खावं असं वाटतं. मग आपण थंड-थंड कोल्डड्रिंक पितो. जर आपण घरी असताना शरीर घामाघूम झाल्यावर अशी तहान लागली तर लगेच फ्रिजमधलं थंडगार पाणी पितो. ज्यामुळे जीवाला एक सुखद आनंद मिळतो. परंतु डॉक्टर ही सवय शक्य तेवढ्या लवकर सोडण्याचा सल्ला देतात. असं का? जाणून घेऊया.

advertisement

झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथील आयुर्वेदिक डॉक्टर वी. के. पांडे सांगतात की, रखरखत्या उन्हातून घरात आल्यावर थंडगार पाणी प्यायल्यास हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. तसंच यामुळे हार्ट स्ट्रोकचा धोकाही वाढतो. विशेषत: ज्यांना हृदयाबाबत काही त्रास असेल, त्यांच्यासाठी थंड पाणी पिणं अति त्रासदायक ठरू शकतं.

हेही वाचा :  सरळ चालून वजन कमी होत नाही? उलट चालून बघा, मेहनत 15 मिनिटांची, रिजल्ट जबरदस्त!

advertisement

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कडक उन्हात शरिरातल्या नसा पसरतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही अचानक थंडगार पाणी पिता तेव्हा नसाही अचानक एकमेकींना चिकटतात. म्हणजेच नसांमध्ये एकाचवेळी पसरणं आणि चिकटण्याचं काम होतं, त्यामुळे हार्ट स्ट्रोक येऊ शकतो.

डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, ही झाली एक सवय, परंतु आता आपल्या जीवनशैलीत अशा अनेक चुकीच्या सवयी आहेत ज्यांचे आपल्या शरिरावर धोकादायक परिणाम होतात. म्हणूनच पूर्वी जे आजार साठीत जडायचे, ते आता अगदी विशीतच होऊ लागले आहेत. अनेकजणांच्या लक्षात येत नाही की, माझ्याकडे सगळ्या सुख-सुविधा असतानाही, माझ्या वाट्याला आजारपण का? कारण नकळत आपल्याकडून आरोग्याबाबत काही चुका होतात. अनेकजणांना थंड पाण्यामुळे ब्रेन हॅमरेजचा त्रासही होतो, कारण थंड पाण्याचा परिणाम थेट नसांवर होतो. म्हणून काळजी घ्यावी.

advertisement

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. परंतु आपण आपल्या आरोग्याबाबत निर्णय घेताना स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडगार पाणी प्यायल्यानं जीव सुखावतो, काळीज नाही! Heart Attack येण्याची सुरुवात इथूनच होते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल