सरळ चालून वजन कमी होत नाही? उलट चालून बघा, मेहनत 15 मिनिटांची, रिजल्ट जबरदस्त!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
काहीवेळ उलट चालावं, हे वाचायला कितीही विचित्र किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, यामुळे शरिराला नेमका काय उपयोग होतो, जाणून घेऊया.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरिराला व्यायाम हवाच, चालणं हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. परंतु अनेकजणांबाबत असं होतं की, कितीही चाललं तरी वजन किंचितही कमी होत नाही. मात्र दररोज काही अंतर चालल्यानं शरीर निरोगी राहत, यात काहीच शंका नाही. तुम्ही कधी उलट चालण्याचे शरिराला काय फायदे होतात, याबाबत ऐकलंय का? उलट चालणं हे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतं, असं अनेक संशोधनांमधून समोर आलंय.
advertisement
काहीवेळ उलट चालावं, हे वाचायला कितीही विचित्र किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, यामुळे शरिराला नेमका काय उपयोग होतो, जाणून घेऊया. डॉक्टर टीना कौशिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, दररोज केवळ 15 मिनिटं उलट चालावं. यामुळे काहीच दिवसांत तुम्हाला शरिरात बदल दिसतील. विशेषतः यामुळे मेंदूचं आरोग्य सुदृढ राहतं.
advertisement
वजन कमी होण्यास मिळते मदत
उलट चालल्यानं शरिरातील कॅलरी प्रचंड प्रमाणात बर्न होते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय गुडघेदुखीवरही आराम मिळतो. त्याचबरोबर शरिरावर कुठेही सूज आली असेल, तर तीसुद्धा उलट चालल्यानं ओसरते. त्यामुळे वयस्कर व्यक्तींनी हा व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
मानसिक आरोग्य उत्तम राहतं
मानसिक ताण आला असेल, तर उलट चालण्यानं तो दूर होऊ शकतो. शिवाय मन स्थिर आणि डोकं शांत राहतं. महत्त्वाचं म्हणजे सगळा ताण दूर होतो.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
May 23, 2024 3:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
सरळ चालून वजन कमी होत नाही? उलट चालून बघा, मेहनत 15 मिनिटांची, रिजल्ट जबरदस्त!