Fancy Diet करायची काही गरज नाही! नाश्त्यात खा 'हा' पदार्थ, वजन आपोआप होईल कमी

Last Updated:
आपला संपूर्ण दिवस हा दिवसाची सुरूवात नेमकी कशी होतेय, यावर अवलंबून असतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता परफेक्ट असायला हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. परंतु तुम्ही तुमच्या वजनाबाबत चिंतेत असाल आणि म्हणून कमी खाण्याचा निर्णय घेतला असेल, तर आता अजिबात मन मारून जगू नका. तुम्हीसुद्धा पोटभर उत्तम नाश्ता करू शकता. ज्यामुळे तुमचं पोट बराचवेळ भरलेलं राहील आणि अशक्तपणाही येणार नाही. (सिमरन जीत सिंग, प्रतिनिधी)
1/5
मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतात. त्यांमध्ये फायबर भरपूर असतं. तुम्ही नाश्त्यात मोड आलेले चणे, राजमा, मूग आणि त्यासह सोयाबीन खाऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेलच, शिवाय पचनशक्तीही भक्कम होईल. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा नाश्ता उपयुक्त असतो. तसंच मोड आलेल्या कडधान्यांमुळे पोटही व्यवस्थित साफ होतं.

advertisement
2/5
गव्हाची खिचडी हा सर्वोत्तम नाश्ता आहे. यात फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचनशक्ती उत्तम राहते, शिवाय पोटही बराच वेळ भरलेलं राहतं. अर्थात भूक कमी लागल्यानं वजन कमी होण्यास मदत मिळते. विशेष म्हणजे यामुळे रक्तातली साखर नियंत्रित राहते.

3/5
कांदेपोहे हा अनेकजणांचा आवडीचा नाश्ता असतो. पोहे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. यात असलेल्या ग्लायसेमिक फूडमुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. शिवाय पोह्यांमध्ये फॅटचं प्रमाण 30 टक्क्यांपेक्षाही कमी असतं. तसंच कॅलरीजही प्रमाण कमी असल्यानं वजन आपोआप कमी होतं. परंतु पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असल्यानं ते कमी प्रमाणातच खावे.

4/5
मुगाचे पराठे केवळ स्वादिष्ट नसतात तर प्रोटीन रिच असतात. मुगात कॉपर, फॉलेट, रायबोफ्लेव्हिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न, व्हिटॅमिन B6 आणि थायमिन, इत्यादी अनेक पौष्टिक तत्त्व असतात. ज्यामुळे पचनसंस्था उत्तम राहते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

5/5
 इडली आणि सांबर हे दोन्ही पदार्थ कमी कॅलरीजचे असतात. इडलीत तर खूपच कमी कॅलरी असतात. शिवाय यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे  भक्कम राहते. नाश्त्यात इडली सांबर खाल्ल्यास दिवसभर पोट भरलेलं राहतं, म्हणजे सारखं सारखं काही  होत नाही. त्यामुळे अर्थातच वजन नियंत्रणात राहण्यास  मिळते.
इडली आणि सांबर हे दोन्ही पदार्थ कमी कॅलरीजचे असतात. इडलीत तर खूपच कमी कॅलरी असतात. शिवाय यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पचनसंस्था भक्कम राहते. नाश्त्यात इडली सांबर खाल्ल्यास दिवसभर पोट भरलेलं राहतं, म्हणजे सारखं सारखं काही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे अर्थातच वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement