पहिली गोष्ट म्हणजे आंब्याचा गुणधर्म उष्ण असतो. जर तुम्ही आंबा थेट बाजारातून आणून किंवा झाडावरून काढून लगेच खाल्ला तर त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. डायटिशियनच्या मते, आंबा खाण्यापूर्वी कमीतकमी तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे त्याची उष्णता बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि आंबा शरीराला अपाय करत नाही.
आंबे खाताना घ्या विशेष काळजी
advertisement
आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण भरपूर असते. तुम्ही एकाच वेळी खूप जास्त आंबे खाल्ले तर रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेषतः धोकादायक असू शकते. त्यामुळे त्यांनी आंबे खाताना विशेष काळजी घ्यावी आणि मर्यादित प्रमाणातच आंब्याचे सेवन करावे.
एवढंच नाही तर जास्त आंबे खाल्ल्याने पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. डायटिशियन मंजू मथळकर यांच्या मते, जास्त आंबे खाल्ल्यास लूज मोशन किंवा जुलाब होऊ शकतात. त्यामुळे आंबा संतुलित प्रमाणात खाणेच फायदेशीर ठरते.
पोटही खराब होऊ शकतं
जर तुम्ही आंब्याचा रस पिण्याऐवजी थेट आंबा खाल्ला, तर त्यातील फायबरचाही तुम्हाला फायदा मिळतो. फायबरमुळे शरीराची पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळता येतात, पण जर फायबरचं प्रमाण जास्त झालं तर पोट खराब होण्याची शक्यताही असते. त्यामुळे लक्षात ठेवा की चवीच्या नावाखाली आरोग्याशी तडजोड करू नका.
हे ही वाचा : Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला तब्बल 4 दशकानंतर मोठा योग, या गोष्टी घेण्याचं टाळा!
हे ही वाचा : सावधान! फॅक्ट्रीमध्ये असं तयार होतं बनावट पनीर; धक्कादायक प्रकार उघड, कारखान्यातून जप्त केलं 58kg पनीर