आहारात अंड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जातोच, अंड्याचे फायदे खूप असल्यानं अंड्यांना सुपरफूड म्हटलं जातं. अंड्यांच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे ते केसांसाठीही फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये असलेली भरपूर प्रथिनं केसांसाठी पोषक घटक आहेत. पाहूयात Egg Hair Mask कसे बनवता येतील.
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल -
अंडी आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करुन केसांना लावता येतं. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. हे मिश्रण चमच्यानं चांगलं मिसळल्यानंतर डोक्याला लावा आणि अर्ध्या तासानंतर डोकं धुवा. केस मऊ होतात.
advertisement
Diet for Fat loss : पोटावरची चरबी कमी होण्यासाठी खास टिप्स, आहार - जीवनशैलीतले बदल आवश्यक
अंडी आणि दही
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका अंड्यामध्ये दही आणि थोडा मध मिसळून पेस्ट तयार करा. 40-50 मिनिटं केसांना लावा आणि नंतर धुवा. हा हेअर मास्क तुम्हाला ओल्या केसांवर लावायचा आहे.
अंडी आणि कोरफड
हेअर मास्क बनवण्यासाठी एक चमचा कोरफड, एक चमचा अंड्यातील पिवळ बलक आणि एक चमचा लिंबू मिक्स करा. ते मिक्स करून केसांना लावा आणि तासाभरानंतर केस धुवा. यामुळे केस फुटण्याची समस्याही दूर होते.
Vision: या 5 गोष्टी आहेत डोळ्यांसाठी वरदान.. दृष्टी दीर्घकाळ चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त
अंडी आणि मेथीचे दाणे
3 चमचे मेथीदाणे रात्री भिजत ठेवा. हे दाणे बारीक करून पेस्ट बनवा आणि या पेस्टमध्ये एक अंडं फोडून टाका. हा हेअर मास्क 40-45 मिनिटांसाठी केसांवर लावता येतो. यामुळे केस मजबूत होतात.
अंडी आणि केळी
केस जास्त कोरडे आणि निर्जीव दिसत असतील तर अंडी आणि केळी मिक्स करुन हेअर मास्क बनवा. या हेअर मास्कनं केसांचा कोरडेपणा कमी होऊ लागतो. यासाठी एक केळ कुस्करुन घ्या, आणि त्यात एका अंड्यासह थोडं खोबरेल तेल घाला आणि पेस्ट बनवा. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवा.