तासन्तास स्क्रीनसमोर बसून काम करण्यामुळे आणि मोबाईलमुळे डोळ्यांना थकवा येणं ही जाणवते आहे. कॉम्प्युटरवर काम करणं, स्मार्टफोन, टिव्ही पाहणं यामुळे डोळ्यांना थकवा येतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, सूज, दृष्टी अंधुक होणं किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी या 4 पद्धती वापरून पहा
Tanning : टॅनिंग कमी करण्यासाठी घरी बनवता येईल स्क्रब, कोरडी त्वचा होईल मुलायम
advertisement
1. 20-20-20 नियम वापरुन पाहा
डोळ्यांचा थकवा कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे 20-20-20 नियमांचं पालन. दर 20 मिनिटांनी स्क्रीनपासून 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पहा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि डोळ्यांचा थकवा कमी होतो.
2. डोळ्यांना मसाज करा
डोळ्याभोवती हलक्या हातांनी मसाज केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि डोळ्यांना आराम मिळतो. यासाठी, डोळ्याभोवती बोटं हलक्या दाबानं गोलाकार फिरवा. या मसाजमुळे थकलेल्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.
Winter Food : हिवाळ्यातल्या हंगामी भाज्या खा, तब्येत कमवा, आजार दूर पळवा
3. चांगली झोप घ्या
डोळ्यांसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. पुरेशी आणि गाढ झोप घेतली तर डोळ्यांना पूर्ण विश्रांती मिळते. प्रौढांना 7-8 तासांची झोप आवश्यक असते. झोपण्यापूर्वी मोबाईल फोन किंवा इतर स्क्रीनपासून दूर राहा, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना पूर्ण विश्रांती मिळेल आणि ताजंतवानं वाटेल.
4. थंड पाण्यानं डोळे धुवा
डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर थंड पाण्यानं डोळे धुणं हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. थंड पाण्यानं डोळ्यांची सूज कमी होते आणि डोळ्यांना ताजेपणा जाणवतो. तुम्ही थंड पाण्यात कापड बुडवून काही वेळ डोळ्यांवर ठेवू शकता, यामुळे डोळ्यांना थंडावा आणि आराम मिळेल.
